नवी दिल्ली 26 नोव्हेंबर : तीन वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आली आणि जगात सर्वत्र हाहाकार माजला. एकमेकांच्या संपर्कात आल्यानं कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यानं नागरिकांना विलगीकरणात ठेवलं जातं होतं. मानवी नातेसंबंधाचं महत्त्व या काळात सर्वांनाच कळलं. अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावलं, तर बरेच जण सर्वांत प्रिय व्यक्तीपासून काही काळासाठी का होईना दुरावले गेले. असंच काहीसं रशियाची निक व चीनचा ओयांग या जोडप्यासोबत घडलं. त्यांचं लग्न होताच लॉकडाउन लागू झालं आणि दोघंही तीन वर्ष आपापल्या देशात अडकून पडले. तीन वर्षांनी ते एकमेकांना भेटले खरे; पण हृदयविकाराचा झटका आल्याने पत्नी निकचा काही वेळातच मृत्यू झाला अन् ही भेट औट घटकेची ठरली. ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या करून मायदेशी पळाला, आरोपी भारतीयाला दिल्लीतून अटक चीनच्या सोशल मीडियावर सध्या ही प्रेमकथा प्रचंड व्हायरल होत आहे. ‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. 38 वर्षीय ओयांग हा चीनचा रहिवासी, तर 30 वर्षीय निक ही रशियाची नागरिक होती. दोघं म्युझिक इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. 2018मध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2019मध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न केलं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दोघंही निकच्या आईला भेटण्यासाठी रशियाला गेले. सासूला भेटून ओयांग लवकरच चीनला परतला. निक मात्र काही महिन्यांनंतर चीनला जाणार होती. परंतु, कोरोना लॉकडाउनमुळे दोघंही आपापल्या देशात अडकून पडले. त्यांची भेट दुरापास्त झाली. सर्व निर्बंध हटल्याने या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हे जोडपं एकमेकांना भेटले. पण ही भेट औट घटकेची ठरली. तीन वर्षांनंतर भेट झाल्यावर दोघं एकमेकांशी शब्दही बोलले नाहीत. पाच मिनिटांपर्यंत दोघंही रडतच होते. त्यावेळी घडलेला प्रसंग सांगताना ओयांग म्हणाला, की इतक्या वर्षांनी भेट झाल्यानं दोघंही खूप आनंदी होतो. घरी जाण्यासाठी आम्ही निघालो. एक्स्प्रेस वेवरून प्रवास सुरू होता. त्याच वेळी निकला श्वास घेण्यास त्रास होत होता. तत्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेलं; पण तिला हृदयविकाराचा झटका आला होता. ती वाचू शकणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. परंतु, ओयांगने हिम्मत न हारता पत्नी निकला 150 किलोमीटर दूर असलेल्या मोठ्या रुग्णालयात नेलं; पण तिथं ती कोमात गेली व एक शब्दही बोलू शकली नाही. समलैंगिक जोडप्यांना थाटता येणार संसार? कोर्ट काय निर्णय देणार? बालपणापासूनच आजारी होती निक निक बालपणापासूनच आजारी असल्याचं ओयांगने सांगितलं. चीनमधून रशियाला जाताना फ्लाइटमध्येही निकची प्रकृती बिघडली होती. मृत्यूनंतर अवयवदान करण्यासंबंधी दोघांनी निश्चय केला होता. त्यामुळे निकच्या मृत्यूनंतर तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याचं ओयांग म्हणाला. निकनं जिवंत असतानाच अवयवदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं तिचं खूप कौतुकही होतं आहे. चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय प्रेमकथा पत्नीबद्दल बोलताना ओयांग म्हणाला, की ‘माझी पत्नी माझ्यावर जिवापाड प्रेम करायची. स्वत:चा जीव धोक्यात घालून माझ्या प्रेमासाठी ती चीनमध्ये आली.’ चीनच्या सोशल मीडियावर अनेक जण निकबद्दल वाचून भावनिक झाले. या महिलेला स्वर्गातही सदैव प्रेम मिळेल, अशी भावना एका युझरने व्यक्त केली. ‘लोक तुला कधीही विसरणार नाहीत,’ अशी प्रतिक्रिया अन्य एका युझरने दिली. तिसऱ्या युझरच्या मते, ही प्रेमकथा खूपच हृदयद्रावक आहे, याचा स्वीकार करणं खरंच खूप अवघड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.