मुंबई 14 मार्च : पती-पत्नीत खडाजंगी झाली. यानंतर दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान पतीने न्यायालयाला सांगितलं की, माझ्याकडे फक्त 12 लाख रुपये ठेव आहेत. परंतु, त्या व्यक्तीच्या मालमत्तेची तपासणी केली असता, त्याचं वार्षिक उत्पन्न साडेतीन कोटी रुपयांहून अधिक असल्याचं आढळून आलं. यानंतर घटस्फोटाच्या परिणामी पत्नीला पतीच्या मालमत्तेपैकी 60% भाग मिळाला.
नवरदेवाला सरकारी नोकरी असल्यानं थाटामाटात लावलं लग्न; पण दुसऱ्याच दिवशी कुटुंबावर आभाळ कोसळलं
चीनची राजधानी बीजिंगमध्ये उघडकीस आलेलं घटस्फोटाचं हे विचित्र प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच गाजलं आहे. 'बीजिंग डेली'च्या वृत्तानुसार, पती लीने आपली मूळ संपत्ती आणि उत्पन्नाची माहिती पत्नी झांगपासून लपवून ठेवली. दोघांचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर झांगने कोर्टाला पतीच्या संपत्तीची चौकशी करण्याची विनंती केली. मालमत्तेची छाननी केली असता घटस्फोटाच्या प्रक्रियेपूर्वीच लीने त्याच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आले.
लीने हे सर्व केलं, जेणेकरून घटस्फोटाच्या बदल्यात त्याला आपल्या पत्नीला कमी पैसे द्यावे लागतील. मात्र घटस्फोटानंतर लीला 60 टक्के रक्कम झांगला द्यावी लागली. मात्र घटस्फोटानंतर लीने झांगला भरपाई म्हणून एकूण किती रक्कम दिली आहे? ही माहिती उघड होऊ शकली नाही. पण, या घटनेची चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर खूप चर्चा होत आहे.
चीनमध्ये घटस्फोट कायद्यात बरेच बदल झाले आहेत. यामध्ये घटस्फोटापूर्वी जोडप्याची मालमत्ता तपासली जाते. रिपोर्टनुसार, याआधी चीनमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये लोक अनेकदा त्यांच्या मालमत्तेची माहिती लपवत असत. या व्हायरल घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका युजरने लिहिले - एखाद्या व्यक्तीने एकदा लग्न केले की तो आपले संपूर्ण आयुष्य आपल्या पत्नीवर घालवतो. दुसर्या युजरने लिहिले - ही पत्नी थोडी भाग्यवान होती की ती आपल्या पतीचा पगार सहजपणे ट्रॅक करू शकली. हे प्रत्येकालाच शक्य नसतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Divorce, Wife and husband