कोलकाता 14 मार्च : आपल्या मुलीचं लग्न उत्तम घरात व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यातही मुलाला सरकारी नोकरी असेल तर आनंद वेगळाच. पश्चिम बंगालच्या कूच विहारमधील एका कुटुंबाची अशीच इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न एका सरकारी शिक्षकासोबत ठरवलं. आपल्या मुलीचा विवाह सरकारी कर्मचाऱ्याशी होणार आहे, हा विचार करूनच मुलीच्या घरातील सर्वजण खूप आनंदी झाले. त्यामुळेच लग्नाच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नव्हती. पण तो आनंद मुलीच्या घरात फार काळ टिकला नाही. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाची सरकारी नोकरी गेली. प्रियकर वेळेत भेटायला न आल्याने रस्त्यावरच तरुणीचं धरणे आंदोलन; मग केलं असं काही की पोलिसांनाही फुटला घाम प्रणव रॉय असं नवरदेवाचं नाव आहे. तो 2017 पासून जलपाईगुडी येथील राजदंगा केंडा मोहम्मद हायस्कूलमध्ये कार्यरत होता. हे पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न ठरवले होते. दोन्ही कुटुंबं खूप आनंदात होती. गेल्या गुरुवारी दोघांचंही थाटामाटात लग्न झालं. प्रणव शुक्रवारी पत्नीसह घरी परतला. मात्र त्याच दिवशी न्यायालयाने मोठा निर्णय देत 842 शिक्षकांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत त्या रद्द करण्याचे आदेश दिले. ही यादी सार्वजनिक झाली तेव्हा त्यात प्रणव रॉय यांचंही नाव होतं. नोकरी गेल्याचे वृत्त समजताच घरात शोककळा पसरली. थोड्याच वेळात प्रणवच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. लोक विविध कमेंट करू लागले. एकाने लिहिलं, ‘गुरुवारी लग्न झालं, शुक्रवारी नोकरी लागली, शनिवारी लग्न तुटलं. ही घटना इतिहासाच्या पानात लिहिली जाईल’. मात्र, या संपूर्ण घटनेवर वधू किंवा वराक़डील कोणीही भाष्य करण्यास तयार नव्हतं. नवविवाहित जोडप्यानंही यावर भाष्य केलं नाही.
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला होता. पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या गेल्या, त्याचे पुरावेही सापडले होते. यानंतर हायकोर्टाने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 57 आणि 785 अशा एकूण 842 जणांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यापैकी कोणालाही शाळेत प्रवेश करता येणार नाही, असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. ते शाळेतील कोणत्याही गोष्टीला हात लावू शकत नाहीत. त्यांच्या पगाराच्या परताव्याच्या मुद्द्यावर न्यायालय नंतर निर्णय घेईल. न्यायालयाने विचारलं की ग्रुप सी प्रकरणांमध्ये शिफारस केलेल्या किती जणांनी ओएमआरमध्ये छेडछाड केली आहे. केवळ प्रणव रॉयच नाही तर अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लग्नानंतर काही दिवसांतच नवरदेवाची नोकरी गेली.