मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात

VIDEO - पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात

लग्नाच्या दिवशीच नवरीने नवरदेवाला चांगलंच लुटलं आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरीने नवरदेवाला चांगलंच लुटलं आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरीने नवरदेवाला चांगलंच लुटलं आहे.

मुंबई, 31 ऑगस्ट : आतापर्यंत लग्नात (Wedding video) नवरीच्या (Bride video) बहिणी किंवा मैत्रिणी म्हणजे नवरदेवाच्या (Groom video) मेहुण्यांना नवरदेवाला भारी पडत असल्याचं तुम्ही पाहिलं आहे. पण सध्या असा एक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे, ज्यात चक्क नवरीच नवरदेवाला (Bride groom video) चांगलीच भारी पडली आहे. मेहुणीने लुटावं अगदी तसंच नवरीनेही आपल्या नवऱ्याला लग्नात लुटलं आहे.

नवरदेवाच्या पाय धरून, त्याच्या पायावर डोकं टेकवून नवरीने नवरदेवाचा खिसा चांगलाच कापला आहे (Bride touch groom feet). लग्नाचा हा मजेशीर व्हिडीओ (Funny wedding video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

प्रत्येक लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, विधी असतात. बहुतेक लग्नामध्ये नवरीला नवरदेवाच्या पाया पडायला लावलं जातं. असाच हा व्हिडीओ आहे, ज्यात नवरी नवरदेवाच्या पाया पडते आहे. पण नवरीने पाया पडता पडता नवरदेवाला चांगलीच फोडणी घातली आहे.

व्हिडीओत पाहू शकता नवरीने नवरदेवाचे पाय अक्षरशः आपल्या दोन्ही हातात धरले आहेत, त्याच्या पायांवर तिने डोकं टेकलं आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर नवरी एका हाताने नवरदेवाकडून काहीतरी मागताना दिसते आहे.

हे वाचा - नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

नवरदेव तिच्या हातावर आपल्या खिशातील पैसे काढून ठेवतो. नवरी ते पैसे हातात ठेवते, पण ती नवरदेवाच्या पायावरून काही बाजूला होत नाही. मग नवरा तिच्या हातावर आणखी पैसे ठेवतो, ते पैसेसुद्धा ती आपल्या हातात धरते पण त्याच्या पायावरून हटतच नाही. असं करता करता नवरदेव किती तरी पैसे तिच्या हातावर ठेवतो पण नवरी काही त्याच्या पायावरून उठेना. शेवटी नवरा आपलं पैशांचं पाकिटच नवरीच्या हातात देतो. तेव्हा कुठे नवरी नवरदेवाच्या पायावरील डोकं उचलते आणि त्याचे पाय सोडते.

हे वाचा - VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या GF ने BF ला दिली धमकी

निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर नमूद केल्यानुसार हे नेपाळी लग्न आहे. नेपाळी लग्नामध्ये अशी एक परंपरा आहे. ज्यात नवरी नवरदेवाच्या पाया पडते, त्यानंतर नवरदेव तिला पैसे देतो आणि मग ती नवरदेवाचे पाय सोडते. या नवरीने या परंपरेचा चांगलाच फायदा उचलला आहे. तिने चांगलाच चान्स मारून घेतला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding video