मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमाचा झांगडगुत्ता: पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची गर्लफ्रेंड आले आमनेसामने, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू

प्रेमाचा झांगडगुत्ता: पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची गर्लफ्रेंड आले आमनेसामने, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू

 पत्नीसोबत (Wife) असणारे तिचे दोन प्रियकर (Two boyfriends) आणि पतीसोबत (Husband) असणारी त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend) हे अचानक आमनेसामने आल्यानंतर झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू (Death) झाला आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 31 ऑगस्ट : पत्नीसोबत (Wife) असणारे तिचे दोन प्रियकर (Two boyfriends) आणि पतीसोबत (Husband) असणारी त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend) हे अचानक आमनेसामने आल्यानंतर झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू (Death) झाला आहे. योगायोगाने हे सगळे एका जागी आमनेसामने आले आणि आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. हे प्रकरण काही मिनिटांतच हाणामारीवर पोहोचलं आणि या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.

अशी घडली घटना

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका क्षणी पत्नी, तिचे दोन प्रियकर, पती आणि त्याची गर्लफ्रेंड एकमेकांच्या आमनेसामने आले. अशा अवस्थेत एकमेकांना पाहून दोघांनाही एकमेकांचा राग आला. पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. ते पाहून पत्नीचे बॉयफ्रेंड्स आणि पतीची गर्लफ्रेंडदेखील त्या भांडणात सहभागी झाली. जोरदार हाणामारी आणि लाथाबुक्क्यांचं भांडण रस्त्यावर रंगलं. या भांडणात जिव्हारी वार बसल्यामुळे पत्नीच्या एका बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिली ही माहिती

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील एका चहाच्या टपरीवर हे पाच जण आमनेसामने आले आणि जोरदार हाणामारी झाली. यात एक तरुण आणि महिला जखमी झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यात तरुणाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं, तर महिलेवर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे वाचा -सावकारांचा विळखा आजही कायम; सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

पत्नी बसंती आणि पती कन्हैय्या रेगर हे जोडपं जयपूरमध्ये मंडईपाशी राहतं. त्यांना एक मूलदेखील आहे. मात्र एकमेकांचं बाहेर प्रेमप्रकरण सुरू असल्याचं दोघांनाही माहित नव्हतं. स्वतःची चोरी पकडली जाणं आणि जोडीदाराचीही चोरी लक्षात येणं, या दोन्ही बाबी एकाच वेळी झाल्यामुळे दोघांच्याही मनावरचं नियंत्रण सुटल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेवेळी पती आणि त्याची गर्लफ्रेंड हे दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर पत्नीचा दुसरा बॉयफ्रेंड गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime, Jaipur, Murder