मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकली पत्नी, भाजप नेत्याची रस्त्यावरच चपलेनं धुलाई, Video Viral

पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकली पत्नी, भाजप नेत्याची रस्त्यावरच चपलेनं धुलाई, Video Viral

भाजप नेते मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना, पोलिसही तेथे आले. पण मोहितच्या पत्नीला इतका राग आलेला की तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 21 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाजप नेते मोहित सोनकर यांना भाजपच्या महिला नेत्याशी रोमान्स करणं चांगलंच महागात पडलं. ते भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांसोबत एका रूममध्ये असताना अचानक त्यांची पत्नी तिथे पोहोचली. मोहितला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीचा पारा चांगलाच चढला. यानंतर पत्नीने मोहितला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळही केली.

'त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..'; मॉब लिंचिंगवर भाजपच्या माजी MLA चं खळबळजनक विधान, Video

ही घटना शनिवारी रात्री उशिराची आहे. पत्नीसह मोहितची सासू आणि सासरचे इतर लोकही उपस्थित होते. सर्वांनी मोहितला रस्त्यावर नेऊन चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना, पोलिसही तेथे आले. पण मोहितच्या पत्नीला इतका राग आलेला की तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी मोहित यांच्यासोबत असलेल्या महिला नेत्यालाही मारहाण केली.

ना हेल्मेट, ना नियम; साहसवीर गोविंदांनी मुंबईत घातला गोंधळ; पाहा Video

सुमारे तासभर चाललेल्या गदारोळानंतर सगळे तिथून निघाले. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. कानपूर दक्षिण भाजपच्या अध्यक्षा बिना आर्या या प्रकरणी म्हणाल्या की, ही बाब अद्याप त्यांच्या निदर्शनास आलेली नाही. व्हिडिओही त्यांनी पाहिला नाही.

मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. दोघांमधील संबंध चांगले नव्हते. दरम्यान, मोहितला भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले. यानंतर त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Girlfriend, Shocking video viral