जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्यक्तीने पाडला पैशांचा पाऊस! रस्त्यावर पैसाच पैसा, पण एकानेही उचलली नाही नोट कारण...

व्यक्तीने पाडला पैशांचा पाऊस! रस्त्यावर पैसाच पैसा, पण एकानेही उचलली नाही नोट कारण...

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 15 जुलै : पैसा कुणाला नको होईल. अगदी रस्त्याने चालता चालता रस्त्यात पैसा दिसला तरी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणारे क्वचितच. असं असताना रस्त्यावर पैशांचा पाऊस झाला आणि एकानेही एकही नोट स्वतःसाठी उचलली नाही, असं सांगितलं तर साहजिकच धक्का बसेल. पण असंच घडलं आहे ते चीनमध्ये. एका व्यक्तीने रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडला. पण लोकांनी तो पैसा स्वतःसाठी घेतलाच नाही. यामागे एक खास कारण होतं. 67 वर्षांची ही व्यक्ती. जिने चोंगकिंगच्या रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडला. ही व्यक्ती रस्त्यावर दोन प्लॅस्टिक पिशव्या भरून पैसे घेऊन आली.  100 युआनच्या नोटांची बंडलं काढून तो रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर फेकत गेला. त्याने पिशवीत जवळपास 75 लाख रुपये आणले होते, जे तो लोकांमध्ये वाटत होता.  पैसे फेकताना तो हे सर्व बेकार आहे, घेऊन जा, असं बोलत होता. आयुष्यभराची पुंजी खर्चून घेतलं ‘ड्रिम हाऊस’; राहायला जाताच बसला मोठा धक्का त्याच्या आजूबाजूला बरेच लोक जमा झाले. लोकांची गर्दी झाली. पण कुणीच ते पैसे घेतले नाहीत. उलट सर्वजण ते पैसे उचलून त्या व्यक्तीला परत करत होते. स्थानिक मीडिया आऊटलेट सीक्यून्यूज डॉट नेटच्या वृत्तानुसार वांगने रस्त्यावर फेकलेले पैसे पोलीस आणि रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी जमा केले आणि त्याला परत केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलीस चौकशीत या व्यक्तीचं नाव वांगनाम असल्याचं समजलं. रस्त्यावर असे फेकण्यामागे त्याची इमोशनल स्टोरी आहे. त्याने जे कारण सांगितलं ते भावुक करणारं आहे. 10 सेकंद प्रायव्हेट पार्टला स्पर्श, सोशल मीडियावर VIDEO VIRAL; असं का करत आहेत लोक? वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे त्याला मोठा धक्का बसला होता. आता त्याची पत्नीच या जगात राहिली नाही तर ही संपत्ती, पैसा सर्व बेकार असल्याचं तो म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात