मुंबई : महाराष्ट्रच काय तर संपूर्ण भारतभर लग्नाच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यामुळे या सगळ्या परंपरेबद्दल आपल्याला माहित नसते. पण महाराष्ट्रात अनेक लोकांच्या घरी लग्नानंतर जोडप्यांच्या घरी सत्यनारायणाची पुजा घातली जाते, त्यानंतर नवी जोडपी देवदर्शनासाठी जातात. पण या सगळ्यात बऱ्याचदा लग्न झालेली मंडळी जेजुरीलाच का जातात? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? म्हणजे खंडरायाच्या जेजुरीला लोक लांबवरुन येतात, पण दर्शन नक्की घेतात. असं का?
खरंतर लग्नानंतर नवीन जोडपी आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी देवाकडे प्राथर्ना करण्यासाठी जाता. लोक यासाठी आपल्या आसपासच्या मंदीरात तसेच आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी जातात. त्यात जेजुरीचा खंडेराया हा अनेरांच्या घराचा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक त्याच्या दर्शनासाठी जातात.
लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं?
तसेच खंडेराया हे शिवाचं रुप असल्याचं माणलं जातं, तसेच म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप आहे. त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार व्हावा यासाठी अनेक जोडपे देवाच्या दर्शनासाठी जातात.
यामागे आणखी एक कारण असं काही की मालिका किंवा चित्रपटांमधून हे ठिकाण जास्त फेमस झालं आहे, त्यामुळे बहुतांश जोडपे येथे येऊ लागले आहेत.
सिनेमात दाखवल्याप्रमाने येथे नवरा हा आपल्या बायकोला उचलून दर्शनासाठी येतो, या गोष्टीचं देखील अनेकांमध्ये क्रेझ आहे, म्हणून देखील अनेक लोक येथे येतात.
जेजुरीला दर्शानासाठी आल्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. शिवाय अनेक लोक तेथे लग्नानंतरचा गोंधळ देखील घालतात. जेजुरीला नवीन जोडप्यांना घेऊन जाऊन बरेच पूजाविधी केले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jejuri, Lifestyle, Viral, Wedding, Wife and husband