जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं?

लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लोकांनी लग्नासाठीच्या संकल्पना आणि वयाचा फरक या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार बदलल्या असल्या तरी देखील आधी-पासून सुरु असलेल्या या वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स काय सांगतो, याबद्दल तुम्हाला माहितीय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : हल्ली लग्नाचा सिझन सुरु आहे. काही लोक प्रेम विवाह करतात तर काही लोक आजही अरेंज मॅरेज करत आहेत. पण या सगळ्यात बऱ्याचदा लोक कॉमन प्रश्व उपस्थीत करतात, तो म्हणजे दोघांमधील वयाचा फरक. आपल्याकडे अनेक वर्षांपासून हे चालत आलेलं आहे आणि मोठी माणसं देखील नेहमीच सांगतात की मुलगी ही मुलापेक्षा लहान असावी. आपण अशा गोष्टी नेहमी ऐकत आलेलो आहोत. पण यामागचं नेमकं कारण अनेकांना ठावूक नसतं, लोक सांगतात आणि तेच खरं असतं असं आपण मानून फक्त चालत असतो. ‘या’ कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ पण वेळेनुसार परिस्थिती बदलली आणि जोडपे आपल्याच वायाचा साथिदार शोधू लागले आहेत, इतकेच नाही तर काहीवेळा महिला या त्यांच्या नवऱ्यापेक्षाही जास्त वयाच्या असतात. यामध्ये सचिन तेंडूलकर आणि अंजली, तसेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडप्याचं नाव आपल्यासमोर सर्वात आधी येतं. लोकांनी लग्नासाठीच्या संकल्पना आणि वयाचा फरक या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार बदलल्या असल्या तरी देखील आधी-पासून सुरु असलेल्या या वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स काय सांगतो, याबद्दल तुम्हाला माहितीय? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलगा आणि मुलीमधील अंतर हे लग्नासाठी जास्त असावं, मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं. त्यात नवरा हा बायकोपेक्षा वयाने ४ ते ६ वर्षाने मोठा असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं. आता यामागचं कारण काय? यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे. जे खूप रिलेवंट देखील आहे. महिला या पुरुषांपेक्षा वयाच्या ३ ते ४ वर्षांआधीच शरीराने मॅच्युअर होतात. तसेच महिलांमध्ये असलेल्या होर्मोन्समुळे महिलांचं वय जास्त लवकर वाढू लागतं, ज्यामुळे महिला लवकर म्हाताऱ्या देखील होऊ लागतात, या तुलनेत पुरुष वयाच्या उशीरा म्हातारे होतात. त्यामुळे वयातील फरक हा नवराबायोकांच्या नात्यासाठी चांगलं राहिल असंच सायन्स सांगतं. या आयडिअल एज गॅपमुळे नवरा-बायकोंमधील आकर्षण टिकून राहातं, त्यांना एकमेकांत कमी जाणवत नाही ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काही केसेसमध्ये संशोधकांना असं देखील आढळलं की जबाबदारीच्या बाबतीत देखील महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त लवकर जबाबदार बनतात. त्यामुळे महिलाचं वय लग्न करण्यासाठी कमी असलं तरी त्या नवऱ्याला सांभाळू शकतात शिवाय ते आपलं घर देखील सांभाळू शकतात. (नोट: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात