जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नाआधी पत्रिका का जुळवल्या जातात? यामागचं नेमकं कारण माहितीय?

लग्नाआधी पत्रिका का जुळवल्या जातात? यामागचं नेमकं कारण माहितीय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

असे अनेक लोक आहेत, जे कुंडली किंवा पत्रिका जुळवत नाहीत, तरीही त्यांचा संसार चांगला चालतो, मग कशासाठी कुंडली मिलन करायचं असाही प्रश्व विचारला जातो?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : भारतात लग्न जुळवण्याआधी एक गोष्ट आवर्जुन केली जाते, ती म्हणजे पत्रिका जुळवणे. स्वभाव किंवा मन जुळण्यापेक्षाही भारतात पत्रिका जुळण्याला महत्व देतात. कारण ज्योतिषशास्त्र मुलगा आणि मुलीच्या पत्रिका जुळल्या तर आणि तरच ते एकत्र राहू शकतात. पण असं का केलं जातं त्याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत नेहमीच अनेक प्रश्न असतात. ही एक प्रथा आहे असं सगळे लोक मानतात, पण ते कशासाठी हे अनेकांना माहिती नसतं. असे अनेक लोक आहेत, जे कुंडली किंवा पत्रिका जुळवत नाहीत, तरीही त्यांचा संसार चांगला चालतो, मग कशासाठी कुंडली मिलन करायचं असाही प्रश्व विचारला जातो? पण ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार त्या जोडप्याचा संसार त्यांची कुंडली जुळल्यामुळेच चांगला होतो असं म्हटलं जातं. लहान मुलांचे जावळ का करतात? याचे फायदे आणि महत्व माहितीय का? इतर अभ्यासाप्रमाणे यातही काही गणितं मांडलेली असतात. त्याचा विचार आणि अभ्यास करूनच पाहिलं जातं की दोघांचे गुणमिलन होतं की नाही. 1. लग्न किती काळ टिकेल दोन व्यक्तींचा स्वभाव आणि परिस्थिती सहसा कुंडलीवरून जाणून घेतली जाऊ शकते. त्यामुळे मुलगा आणि मुलीची कुंडली जर एकाच वेळी संकटं येणारी असेल तर नातं टिकत नाही असं म्हणतात. त्यावेळी एकाचे तरी ग्रह चांगले असावे लागतात. त्यामुळे लग्न किती काळ टिकेल हे पाहण्यासाठी कुंडली मिलन आहे की नाही ते पाहिलं जातं. 2. नातं टिकून राहण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये गुण आणि दोष असतात. लग्नाआधी ते पाहून घेतलेले अधिक चांगले. मंगळदोष अथवा अन्य काही दोष असल्यास, पत्रिकेनुसार पाहून पुढे नातं टिकेल की नाही याचा अंदाज घेतला जातो. मंगळ असलेल्या व्यक्ती या अति रागीट असल्याचं सहसा दिसून येतं. अशावेळी दोन्ही व्यक्तींना पुढे त्रास होऊ नये आणि नाते व्यवस्थित टिकून राहायला हवे यासाठी लग्न जुळण्याआधी पत्रिका जुळवली जाते. एकूण 36 गुणांपैकी साधारण 18 गुण जमणे गरजेचे आहे असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. यापेक्षा कमी गुण जुळत असल्यास, लग्न करणं योग्य नाही असंही म्हटलं जातं. 3. मानसिक आणि शारीरिक क्षमता प्रत्येक माणसाची प्रकृती आणि स्वभाव हे दोन्ही वेगळे असतात. त्यामुळे लग्न होणाऱ्या दोन व्यक्तीचे स्वभाव आणि प्रकृती एकमेकांशी जुळतात की नाही हे पाहण्यासाठी पत्रिका बघितली जाते. 4. कुटुंबाशी नाते आपण भारतात राहातो जिथे एकत्र कुटुंबपद्धती आहे. त्यामुळे व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाशी पटवून घ्यावे लागते. त्यामुळे पत्रिकेवरून तुम्ही कुटुंबाशी कसे जमवून घ्याल. संतानप्राप्ती कशी होईल याचीही गणितं यातून कळू शकतात. लग्न करण्यापूर्वी जे 36 गुण जुळवतात ते कोणते आहेत? नक्की गुण कसे जुळले जातात? प्रत्येकाचे वर्ण, गण, नाडी, तारा या सर्व गोष्टी वेगळ्या असतात आणि गुणही वेगळे असतात. त्यानुसार ज्योतिषशास्त्र अभ्यास करून याचे गुणमिलन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलन करण्यात येते. 1 गुण : वर्ण-जातीचे मिलन 2 गुण : वैश्य-आकर्षण 3 गुण : तारा-अवधी 4 गुण : योनी-स्वभाव आणि चरित्र 5 गुण : मैत्री-एकमेकांमधील समज 6 गुण : गण-मानसिक क्षमता 7 गुण : भकोत-दुसऱ्याला प्रभावित करण्याची क्षमता 8 गुण : नाडी-संतानजन्म

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात