मुंबई : हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि रुढी आहेत, ज्याबद्दल अनेकांना फारसं काही माहिती नसतं. पण सगळे लोक करतात किंवा शास्त्र असतं ते असं म्हणत अनेक लोक त्या परंपरा पार पाडत असतात. त्यांपैकी एक सर्वात महत्वाची आणि बहुचर्चीत परंपरा म्हणजे जावळ करण्याची. लहान मुलांचे जावळ करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. फक्त वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कुठे जावळ केल्यावर मिरवणूक काढली जाते, तर कुठे जावळ केल्यावर मोठा कार्यक्रम ठेवला जातो. तर कुठे मामाच्या मांडीवर बसून ही प्रथा पार पाडली जाते.
पण नक्की असं का केलं जातं, यामागचं नेमकं उत्तर फार कमी लोकांनी ठावूक असेल, चला जावळाबद्दल काही माहिती घेऊ. जावळ संस्कार हा हिंदू धर्मात वर्णन केलेल्या सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. याला मुंडनविधी असं ही म्हणतात. जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त केले जाते तसेच त्याचबरोबर त्याचे मेंदू खूप वेगवान काम करते असा देखील समज आहे. बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस अपवित्र मानले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. लहान बाळांना का घातले जातात चांदीचे दागिने? जावळाबद्दल असे ही सांगितले जाते की, बाळ आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा हानिकारक बॅक्टेरिया त्याच्या डोक्यात आणि केसांमध्ये असतात जे सहजपणे बाहेर पडत नाहीत. जन्माच्या वेळेस बाळाचे डोके अतिशय नाजूक असल्याने त्या वेळी त्याचे केस काढले जाऊ शकत नाहीत. म्हणून बाळ मोठं झाल्यावर किंवा एक वर्षाच्या आसपास ते केस संपूर्णपणे काढले जातात. जावळाबद्दल असा ही समज आहे की, यामुळे डोक्याचे तापमान नियंत्रित राहते. जावळमुळे बाळाला थेट व्हिटॅमिन डी मिळते. अशावेळी त्याचा मेंदू खूप वेगवान काम करतो. यामुळे मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रकारे होतो. याच कारणामुळे प्राचीन काळी मुलांना गुरुकुलमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवले जात होते तेव्हा त्यांचे केस काढून टाकले जात होते. अनेक लोक केस चांगले येण्यासाठी जावळ केलं जातं असं कारण सांगतात. पण हे कारण १०० टक्के बरोबर नाही. कारण केस हे अनुवंशीक असतात. चांगल्या खाण्यामुळे आणि विटॅमिनमुळे केस चांगले येतात, त्याचा जावळ किंवा टक्कल करण्याशी काहीही संबंध नसल्याचे अनेक डॉक्टर सांगतात. जावळ करताना आणि केल्यानंतर घ्यायची काळजी जावळ करताना शक्यतो सकाळच्या वेळेस करावा, तेव्हा मुलं फ्रेश असतात, ज्यामुळे जास्त रडत नाहीत. शक्यतो ट्रीमरने केस काढावेत वस्तरा टाळावा. जरी वापर करत असाल तरी ब्लेड नवीन असावा, ज्यामुळे बाळाला त्वचेशी संबंधीत प्रॉब्लम्स उद्भवणार नाहीत. जावळ केल्यानंतर बाळांना चांगली अंघोळ घाला आणि डोक्याला तेल किंवा मॉईशूराईजर लावा. म्हणजे डोक्याला फोड येणार नाही किंवा स्किनचा त्रास होणार नाही. यासगळ्यात मुलाचे केस काढले जातात आणि मुलींचे केस राखले जातात, यामागे स्पष्टीकरण हिंदू धर्मपंरपरेनुसार गूढ रीत्या देण्यात येते.

)







