जाहिरात
मराठी बातम्या / Viral / खरंच कंन्डोम ठेवायला असतो का जीन्समधील 'हा' खिसा?

खरंच कंन्डोम ठेवायला असतो का जीन्समधील 'हा' खिसा?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही लोक म्हणतात की तो नाणी ठेवण्यासाठी असतो, तर काही लोकांचा असा देखील समज आहे की तो कंन्डोम ठेवण्यासाठी बनवण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 जुलै : आजच्या काळात महिला असोत किंवा मग पुरुष सगळेच लोक जीन्स घातलताना तुम्हाला दिसतील. आत्ता तर फक्त शहरातच नाही तर गावाकडचे लोक देखील जीन्समध्ये फिरताना तुम्हाला दिसतील. जगभरातील अनेक देशांमधील लोक जीन्स घालतात. फक्त तुम्हाला उत्तर कोरियामध्ये जीन्स कधी दिसणार नाही, कारण तिथे जीन्स घालण्यावर बंदी आहे. मुख्य मुद्दा असा की तुम्ही जीन्सला जर नीट पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की जीन्समध्ये पुढे दोन आणि मागे दोन असे खिसे असतात. परंतू पुढच्या खिशामध्ये आणखी एक अगदी लहान खिसा असतो. ज्यामध्ये कोणतीच गोष्ट राहू शकत नाही. मग तो खिसा कशासाठी असोतो? पाण्यामध्ये कपलनं पार केली हद्द, वॉटरपार्कलाच बनवलं Oyo; घटनेचा Video Viral काही लोक म्हणतात की तो नाणी ठेवण्यासाठी असतो, तर काही लोकांचा असा देखील समज आहे की तो कंन्डोम ठेवण्यासाठी बनवण्यात आला आहे. कारण त्याचा आकार तेवढाच आहे. पण तसं नाही. या खिशाला वेगळ्याच काही कारणांमुळे बनवण्यात आलं आहे अमेरिकन हेवी बँड Mötley Crüe च्या सदस्याने अलीकडेच सोशल मीडियावर या जीन्सच्या खिशाबद्दल एक मीम शेअर केला आहे. मीममध्ये त्यांनी लिहिले आहे की, जीन्सचा हा खिसा म्युझिक अॅपमधून कमावलेले पैसे ठेवण्यासाठी बनवले आहे. म्हणजे त्यात कमी पैसे ठेवता येतात. ही पोस्ट करताच त्याचा हा मीम व्हायरल झाला. यासोबतच हा खिसा खरंच नाणी ठेवण्यासाठी बनवला गेला आहे का? अशीही चर्चा सुरू झाली. बँडच्या टॉमी लीच्या मते, हा खिसा पैसे ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता. आजच्या काळात, आपल्यापैकी बहुतेकजण हे खिशाचा वापर फक्त नाणी ठेवण्यासाठी करतात. याशिवाय बरेच लोक त्यात कंडोम, काही प्रकारचे बिल इत्यादी ठेवतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा खिसा या वस्तू ठेवण्यासाठी बनवला गेला नव्हता. ते बनवण्यामागे एक खास कारण होते. मात्र, आज या कारणाला फारसे महत्त्व नाही. जीन्सच्या खिशाच्या आत बनवलेले हे छोटे खिसे एका खास कारणासाठी बनवले गेले आहेत. याचे कारण 1890 मध्ये दडलेले आहे. वास्तविक, त्यावेळी लेवी जीन्स काउबॉयमध्ये खूप प्रसिद्ध होती. घोडेस्वारी करताना ते आपले घड्याळ या खिशातच ठेवायचे. या घड्याळांना एक साखळी जोडलेली होती जी त्यांच्या कमरेला बांधलेली जायची. आता घड्याळाचा वापर फारसा होत नसला तरी जीन्समधील हे खिसे अजूनही तसेच आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात