मुंबई, 7 सप्टेंबर : निसर्गात आढळणारा प्रत्येक प्राणी, पक्ष्यांचं वेगवेगळ वैशिष्ट्य असतं. त्या प्रत्येकाचं स्वभावगुणही भिन्न असतात. इतर पक्ष्यांच्या तुलनेतं वटवाघूळ (Bats) हा नेहमी कुतूहलाचा विषय ठरला आहे. बरेच जण वटवाघळाला पाहता क्षणी घाबरतात. पण इतर प्राणी-पक्ष्यांप्रमाणे हा देखील एक सस्तन प्राणी आहे. झाडावर किंवा एखाद्या बंद गुहेत (Caves) उलट्या लटकण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्याबद्दल नेहमी चर्चा होते. तो उलटा का लटकतो याबद्दलही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो. ‘आज तक’नं या संदर्भात वृत्त दिलंय. काय आहे कारण? वटवाघूळ उलट्या स्थितीतच पूर्ण रात्र एखाद्या झाडावर काढत असतं. हा आकाशात उडू शकणारा सस्तन जीव आहे. वटवाघळं त्यांच्या क्षमतेचा वापर करून शिकाऱ्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या गुहेत किंवा झाडावर उलटं लटकतात. शरीराच्या चारही बाजूंना पंख ते पसरवत असतात. इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघळांना जमिनीवरून उडण्यासाठी (Take Off) अडचण निर्माण होत असते. इतर पक्ष्यांप्रमाणे त्यांचे पंख मजबूत नसतात. ते गतीने धावू शकत नाहीत आणि उडतानाही आवश्यक ती गती त्यांना पकडता येत नाही. शिवाय त्यांचे मागील पायही लहान व अविकसित असतात. हवेत उलटं लटकत राहिल्यानं वटवाघळं सहज उडू शकतात. उंच ठिकाणांवर चढण्यासाठी ती समोरील पंजांचा वापर करतात व उडतातही. उलटं लटकल्यानं त्यांचा शिकाऱ्यांपासून बचाव होतो. 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक माणूस उलटा का लटकू शकत नाही? वटवाघळांप्रमाणे माणूसही उलटा लटकू शकतो का? असा प्रश्न अनेकदा आपणाला पडतो. पण तसं होऊ शकत नाही. कारण माणूस जर जास्त वेळ उलटा लटकून राहिला तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया (Blood Circulation Process) डोक्याच्या बाजूने सुरू होते आणि रक्त एका बाजूला जमा होतं. परंतु, वटवाघळांचा आकार लहान असतो त्यामुळे उलटं लटकण्यास त्यांना मदत मिळते. उलटं लटकून राहिले तरी वटवाघुळांचं हृदय (Heart) हे कमी प्रमाणातच रक्त शरीराकडं पाठवत असतं. वटवाघूळ उलटं लटकूनही खाली का पडत नाही ? वटवाघळांचे गुडघे मागील दिशेला असतात. जेव्हा ते आराम करतात तेव्हा पायांची बोटं आणि पंजांना जागीच बंद करतात. लटकत असताना त्यांना ऊर्जा खर्चण्याची गरज भासत नाही. अशा स्थितीत शरीराचं वजन आणि गुरुत्वाकर्षणामुळे (Gravitation) त्यांना लटकून राहता येतं. जेव्हा वटवाघळांना आकाशात झेपावायचं असतं तेव्हा ती पायाचे स्नायू वाकवून, बोटं आणि नखं सोडतात आणि उड्डाण सुरू होतं. परदेशी महिलेनं आवडत्या भारतीय खाद्यपदार्थावरून ठेवलं मुलीचं नाव, पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सुसाट घुबड किंवा वटवाघळं भयपटात (Horror Film) भीतीदायक रूपात दाखवली जातात. पण वास्तविक पाहता त्यांच्या शरीरांची ठेवण त्यांना असं करण्यास भाग पाडत असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेही अंधश्रद्धा बाळगली जाऊ नये, यासाठी अनेक प्राणी, पक्षीप्रेमी सातत्यानं प्रयत्न करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.