जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

15 वर्षांच्या मुलाने केला भलताच प्रताप (प्रतीकात्मक फोटो)

15 वर्षांच्या मुलाने केला भलताच प्रताप (प्रतीकात्मक फोटो)

15 वर्षांच्या मुलाने आपल्या प्रायव्हेट पार्टसोबत जे केलं त्यानंतर त्याची इतकी भयंकर अवस्था झाली की त्याचा जीवही गेला असता.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 06 सप्टेंबर : अनेकांना आपल्या शरीराबात जाणून घेण्याची इच्छा असते. पण काही जणांची ही इच्छा इतकी तीव्र होते की ते जोशात भलतंच करून बसतात. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने आपल्या प्रायव्हेट पार्टसोबत नको ते खेळ केला. त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली. त्याचा वैद्यकीय रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. यूकेतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे. एका 15 वर्षांच्या मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. जेव्हा तो लघवी करायचा तेव्हा त्याला खूप वेदना व्हायच्या. डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या. त्याचा एक्स-रे रिपोर्ट काढला तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून तेसुद्धा शॉक झाले. कारण त्या मुलाचं गुप्तांग  आणि पोटात चक्क एक यूएसबी केबल होती. या केबलला गाठी पडल्या होत्या. हे वाचा -  ‘ब्रेनडेड’ रुग्णाचे अवयव काढायला जाताच अचानक ‘मृतदेह’…; डॉक्टरांनाही फुटला घाम डॉक्टरांनी त्याला ही यूएसबी त्याच्या शरीरात कशी गेली याबाबत विचारलं तेव्हा त्याने यामागील जे कारण सांगितलं ते धक्कादायक आहे. प्रायव्हेट पार्टचा आकार मोजण्यासाठी तो ही केबल पेनिसमधून आत घालत होता. त्याचवेळी ही केबल आतच अडकली. (फोटो सौजन्य - ScienceDirect)

(फोटो सौजन्य - ScienceDirect)

त्याने ती खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. कारण आत केबलला गाठी पडल्या होत्या. जेव्हा तो केबल खेचण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या शरीराच्या आत रक्तस्राव होत होता आणि हे रक्त मूत्रमार्गातून बाहेर येत होतं. हे वाचा -  जीममध्ये वजन घटवायला गेलेल्या महिलेची झाली भयंकर अवस्था; बोलवावे लागले पोलीस डॉक्टरांनी लगेच त्याचं ऑपरेशन केलं आणि केबल त्याच्या शरीरातून बाहेर काढली. काही दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सायन्स डायरेक्ट रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2021 मधील ही घटना आहे. यूरोलॉजी केस हिस्ट्रीमध्ये या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात