नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात, हे सर्वांना माहीत आहे. ही अतिशय सामान्य बाब आहे. जेव्हा आकर्षण कौतुकाच्या पलीकडे जातं आणि चुकीच्या नात्यात रूपांतरित होतं तेव्हा गडबड होते. असं झाल्यास काही जणांचं वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त होऊ शकतं. कारण, भारतीय संस्कृतीमध्ये विवाहबाह्य संबंध नेहमीच चुकीचे मानले गेले आहेत. अनेकदा लग्नाच्या काही काळानंतर, पुरुषांना इतर स्त्रिया आवडू लागतात. ते त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. ते त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचारही करू लागतात. पण, या मागील कारण काय आहे, याचा कधी विचार तुम्ही कधी केला आहे का? ‘चौपाल टीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चाणक्य नीतिमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, संबंध, देश आणि जगाशी संबंधित तत्त्वांची माहिती स्पष्ट केलेली आहे. चाणक्य नीतिमध्ये आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या नात्याबाबतही काही तत्त्वं सांगितली आहेत. कोणत्या कारणांमुळे पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात याबाबत त्यांनी सांगितलं आहे. हेही वाचा - Valentine Week: प्रेमासाठी पोहोचला साता समुद्रापार, चित्रपटापेक्षा हटके Love Story शारीरिक समाधान न होणं: पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंधाची महत्त्वाची भूमिका असते. त्याच्या अभावामुळे दोघांमधील आकर्षण कमी होऊ लागतं. अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंधांचा विचार मनात येऊ लागतो. कमी वयात लग्न होणं: लहान वयात लग्न होणं हे पती-पत्नीच्या नात्यासाठी चुकीचं आहे. तरुणवयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत जास्त गंभीर असते. कमी वयात समजही कमी असते. करिअरची चिंता जास्त असल्यामुळे अनेकांचं बाकी कशातही लक्ष लागत नाही. कालांतरानं, जेव्हा जीवनात स्थैर्य येतं आणि करिअर सुरळीत होतं, तेव्हा व्यक्ती आपल्या इच्छांकडे लक्ष देते. अशा परिस्थितीतदेखील विवाहबाह्य संबंधांचा धोका वाढू लागतो. हेही वाचा - व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल! अवघ्या 10 सेकंदात मागवली ऑनलाईन ऑर्डर, पाहा Video जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होणं: वैवाहिक जीवनात असं निदर्शनास येतं की, अनेकांचं आपल्या जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होतं. अशा परिस्थितीत लोकांना इतर महिला किंवा पुरुष आवडू लागतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी पती किंवा पत्नी दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नात्यातील प्रेम टिकून राहतं.
नात्यात विश्वास गरजेचा: काही पुरुष पत्नी असताना विवाहबाह्य संबंध योग्य मानतात. अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यात परस्परांवरील विश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतात. मुलांच्या जन्मानंतर नातेसंबंधात बदल: आई-वडील होईपर्यंत वैवाहिक जीवनात जास्त उत्कटता असते. असं निदर्शनास आलं आहे की, मुलाच्या जन्मानंतर पुरुष आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतात. पत्नी आपल्या पतीऐवजी मुलांना जास्त महत्त्व देऊ लागते, हे त्यामागील कारण मानलं जातं. वरील कारणांमुळे बहुतेक पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होत असल्याचं चाणक्यांनी म्हटलं आहे.