नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : अनेक लोकांना खाण्याची खूप आवड असते. कधीही काहीही खायचं म्हटलं की ते कायमच तयार असतात. अशांना ‘फूडी’ म्हटलं जातं. आजकाल तर काहीही खायचं म्हटलं तरी सहजरित्या मिळत असल्यामुळे सामान्य लोकांची मजा सुरुये. यातच ऑनलाईन फूड ऑर्डरमुळे काहीही आणि कधीही खाणं सोपं झालंय. ऑनलाईन फूड ऑर्डरच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर तर या घटनांचे फोटो आणि व्हिडीओही समोर येत असतात. अशातच ऑनलाईन ऑर्डरसंबंधित आणखी एक किस्सा समोर आला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर केलेलं अन्न त्याला अगदी 10 सेकंदात मिळालं असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 10 सेकंदांमध्ये व्यक्तीला ऑनलाईन फूड डिलिव्हरी कशी मिळाली याविषयी पाहूया. एका व्यक्तीने एक कॅनेडियन मध्यरात्री बेंगळुरूच्या कोरमंगला येथील मॅकडोनल्डमध्ये गेला मात्र त्याला दुकान बंद असल्याचं सांगितलं. मग त्याने शक्क्ल लढवत स्विगीवरुन मॅकडोनल्डकडे ऑर्डर मागवली. दुकानाखालीच उभा असल्यामुळे व्यक्तीला अगदी काही सेकंदांमध्ये ऑर्डर मिळाली.
Drove to Koramangala for midnight McDonald's, they said they were closed, but the pick-up window was full of delivery guys. What to do?
— Caleb Friesen (@caleb_friesen2) February 8, 2023
I ordered Swiggy from McDonald's to McDonald's. 10-second delivery achieved. pic.twitter.com/W3PhzmGJrT
@caleb_friesen2 नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत व्यक्तीने लिहिलं, “मध्यरात्री कोरमंगलाला गेलो, त्यांनी सांगितले की शॉप बंद आहेत, पण पिकअप विंडो डिलिव्हरी बॉईजने भरलेली होती. काय करावे? मी मॅकडोनाल्डसाठी स्विगीकडून ऑर्डर केली. मॅकडोनाल्डखालीच उभा असल्यामुळे 10 सेकंदांमध्ये डिलिव्हरी मिळाली”.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर स्विगीच्या अकाउंटवरुनही प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.