नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : सध्या सगळीकडे प्रेममय वातावरण असून कपल या प्रेमाच्या आठवड्याचा आनंद घेत आहेत. सर्वत्र प्रेमाविषयी प्रेमाच्या खास दिवसांविषयीची धूम पहायला मिळत आहे. अशातच सोशल मीडियावर प्रेमाविषयीचे अनेक किस्सेदेखील समोर येत आहेत. अनेक हटके लव्हस्टोरी चर्चेत येत आहेत. अशातच आणखी एका लव्हस्टोरीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. यामध्ये एका भारतीय तरुणाला विदेशी तरुणीवर कसं प्रेम जडलं याचा किस्सा आहे. भारतीय मुलगा इंग्रजी शिकण्यासाठी फिलिपाईन्सच्या मुलीशी चॅट करत होता. दोघांची मैत्री झाली, त्यानंतर लांबचे नाते निर्माण झाले आणि त्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केले. या जोडप्याने एका यूट्यूब व्हिडिओमध्ये त्यांची प्रेमकथा शेअर केली आहे आणि त्यांच्या प्रेम कथेविषयी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली आहेत.
ही लव्हस्टोरी प्रकाश पांचाळ नावाच्या युट्यूबरची असून त्याचे युट्युबवर 10 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. . तो फिलिपाइन्समध्ये राहणाऱ्या पत्नी थेरेसीसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. प्रकाश हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात, तर त्यांची पत्नी ख्रिश्चन धर्माची आहे. अखेर, तो फिलिपाइन्समधील मुलीला कसा भेटला, त्याचे लग्न कसे झाले? याबाबत सविस्त सांगितलं. प्रकाश म्हणाला, 2008 मध्ये कॉलेज पूर्ण केल्यानंतर त्याच्या मामाने इंग्रजी शिकण्याचा आग्रह धरला. मामाचे म्हणणे त्याने गांभीर्याने घेतले. त्याला एक अडचण होती की तो इंग्रजी बोलणार कोणासोबत? त्याला इंग्रजी बोलण्यासाठी मित्र मिळत नव्हते. त्यानंतर त्याला कोणीतरी सांगितलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तू लोकांशी इंग्रजीत बोलू शकतो. त्याकाळी मेसेंजर खूप लोकप्रिय होते. त्यानंतर त्याने अमेरिकेतील लोकांशी बोलायला सुरुवात केली. प्रकाश म्हणाला, मी याहू मेसेंजरवर फिलिपाइन्सच्या लोकांशी बोललो. या लोकांशी बोलल्यानंतर माझे इंग्रजी सुधारू लागले.
प्रकाशने पुढे सांगिले की त्याने 2010 मध्ये फेसबुक जॉईन केले. यादरम्यान, याहूवर त्याच्यासोबत आधीच जाहिरात असलेले लोक फेसबुकवर दिसू लागले. इथे तो थेरेसीशी बोलू लागला. त्यानंतर प्रकाशने थेरेसला प्रपोज केले. त्याने घरीही याविषयी सांगितलं. थेरेसला भेटण्यासाठी त्याने फिलिपाइन्सला जाण्याची योजना आखली. मात्र त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. प्रकाशने सिंगापूरमार्गे फिलिपाइन्सला जात थेरेसशी कोर्ट मॅरेज केले.