Home /News /viral /

महिलेनं फ्लाइटमध्ये सहप्रवाशांना वाटले च्युइंगम आणि इअर प्लग; समोर आलं Emotional कारण

महिलेनं फ्लाइटमध्ये सहप्रवाशांना वाटले च्युइंगम आणि इअर प्लग; समोर आलं Emotional कारण

विमानाने उड्डाण केलं, की कानात दडे बसू शकतात. तसंच टर्ब्युलन्समुळे (Turbulence) काही वेळा अन्यही काही त्रास होतो. त्यामुळे मुलं घाबरतात आणि रडायला किंवा ओरडायला सुरुवात करतात.

सॅन फ्रान्सिस्को, 11 जून: विमानातून प्रवास (Flight Journey) करणाऱ्यांमध्ये काही जण असेही असतात, की ज्यांच्याबरोबर लहान मुलं असतात. मुलं मोठ्या वयाची असली, तर त्यांना सांभाळणं सोपं असतं; मात्र अगदीच कमी वयाची मुलं असली, तर त्यांना सांभाळणं मात्र अवघड होतं. विमानाने उड्डाण केलं, की कानात दडे बसू शकतात. तसंच टर्ब्युलन्समुळे (Turbulence) काही वेळा अन्यही काही त्रास होतो. त्यामुळे मुलं घाबरतात आणि रडायला किंवा ओरडायला सुरुवात करतात. आई-वडिलांना मुलांना सांभाळण्याचं तर टेन्शन असतंच; पण त्यांच्या आरडाओरड्यामुळे सहप्रवाशांनाही त्रास होतो, याचंही टेन्शन असतं. अलीकडेच आपल्या बाळाला घेऊन विमानप्रवास (Flight Journey with toddler) करणाऱ्या एका महिलेलाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. त्याच्याशी संबंधित एक पोस्ट लिंक्डइनवर सध्या व्हायरल (Viral Post on LinkedIn) होत आहे. हर्षकुमार नावाच्या व्यक्तीने अलीकडेच एक फोटो शेअर केला आणि त्यासोबत एक गोष्टही शेअर केली आहे. अर्थात, या संदर्भात काही सांगताना हेही स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे, की ही एक व्हायरल पोस्ट आहे. त्यामुळे फोटोसोबत करण्यात आलेला दावा खरा आहे की नाही, याबद्दल आम्ही खात्री केलेली नाही. एक्सपायरी डेट संपल्यानंतरही तुम्ही बिनधास्त खाऊ शकता 'हे' पदार्थ, आरोग्याला होणार नाही धोका! या व्हायरल पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की कोरियातल्या (Korea) सोल या शहरातून अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को (San Fransisco) शहरात जाणाऱ्या एका फ्लाइटमधून एक महिला आपला छोटा मुलगा आणि आपली आई यांच्यासोबत प्रवास करत होती. 10 तासांच्या या प्रवासात आपला 4 महिन्यांचा मुलगा हमखास रडणार आणि खूप आरडाओरडा करणार, याची तिला खात्री होती. त्यामुळे सर्वांना होणार असलेला संभाव्य त्रास लक्षात घेऊन त्या महिलेने विमानातल्या 200हून अधिक प्रवाशांना एकेक प्लास्टिक पिशवी दिली. त्या प्रत्येक पिशवीत टॉफी, च्युइंग गम आणि इयर प्लग्ज होते. मुलगा रडला, तर प्रवाशांना त्याचा वापर करावा असा तिचा उद्देश होता. woman distribute earplug in plane 1 त्या प्लास्टिक बॅगमध्ये एक पत्रही होतं. त्यातला संदेश त्या आईने आपल्या मुलाच्या वतीने प्रवाशांना उद्देशून लिहिला होता. त्यात लिहिलं होतं - 'माझं नाव जॅन वू असं आहे. मी 4 महिन्यांचा आहे. मी आज माझी आई आणि आजी यांच्यासोबत मावशीकडे अमेरिकेला जात आहे. हा माझा पहिलाच विमानप्रवास आहे. त्यामुळे मी घाबरलेलो आहे. मला भीती वाटत आहे. त्यामुळे मी रडून गोंधळ घालण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मी शांत राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन; मात्र मी त्याची खात्री देऊ शकत नाही. माझा आवाज खूपच मोठा आणि त्रासदायक झाला, तर या पिशवीत दिलेल्या वस्तूंचा उपयोग करावा आणि आपल्या प्रवासाचा आनंद लुटा.' ही पोस्ट त्या व्यक्तीने शेअर करताच अनेकांना ती आवडली. त्यामुळे साहजिकच ती व्हायरल झाली.अनेकांनी या पोस्टवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी त्या बाळाच्या आईचं कौतुक केलं आहे. अनेकांनी असंही लिहिलं आहे, की या वस्तू देण्याची काहीच गरज नव्हती. कारण त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा, ही अन्य प्रवाशांचीही जबाबदारी होती. Antioxidant Foods: अँटिऑक्सिडंट्स भरपूर असलेले हे पदार्थ जाणीवपूर्वक खा, अनेक आजार होत नाहीत  कोणी सहज कल्पनाही करू शकणार नाही, अशी ही घटना अनेकांना हृद्य वाटली आहे. त्यामुळे त्या संदर्भातली पोस्ट व्हायरल झाली.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: PHOTOS VIRAL

पुढील बातम्या