मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! मजेमजेत अशा ठिकाणी लागली आग की कपडे काढूनही विझली नाही शेवटी...; भयानक VIDEO

Shocking! मजेमजेत अशा ठिकाणी लागली आग की कपडे काढूनही विझली नाही शेवटी...; भयानक VIDEO

आगीशी खेळताना तरुण पेटला.

आगीशी खेळताना तरुण पेटला.

आगीसोबत नको ते खेळ करणं तरुणाला चांगलंच भारी पडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 15 नोव्हेंबर : आगीशी खेळ करू नये, असं सांगितलं जातं. तरी कित्येक जण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आगीसोबत जीवघेणे स्टंट करतात आणि त्याचे भय़ानक परिणाम होता. आगीशी स्टंट करणाऱ्यांचे असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहूनच धडकी भरेल.

आगीशी खेळणाऱ्या तरुणाच्या शरीराच्या अशा भागावर आग लागली की तुम्ही विचारही केला नसेल. आगीशी खेळणं दूर यापुढे तरुण आगीच्या जवळ जाण्याचीही हिंमत करणार नाही. अशी चांगलीच अद्दल त्याला घडली आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता शेकोटी पेटते आहे. त्यावर एक तरुण उभा आहे. शेकोटीच्या दोन्ही बाजूला पाय आणि मध्ये शेकोटी असा तो उभा राहिला आहे. आगीवर नाचतानाही दिसतो आहे. आगीसोबत हा स्टंट पाहून आपल्याला धडकी भरते. खालून आग लागली तर असा विचार आपल्या मनात येतो आणि तीच भीती खरी ठरते.

हे वाचा - आगीशी खेळ अंगाशी आला, फुंक मारताच तरुण पेटला; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

पुढे तुम्ही पाहाल तर या तरुणाच्या पँटला आग लागते. त्याच्या पँटच्या मागील बाजू पेट घेते. त्यानंतर तो आगीवरून बाजूला होतो आणि पळू लागतो. त्याच्यासोबत असलेले लोकही आरडाओरडा करताना दिसतात. त्याच वेळी ती आग त्याच्या पाठीपर्यंत पोहोचते. त्याचं शर्ट जळतं. हातांनी आग विझवण्याचा प्रयत्न करतो पण आग अधिकच वाढते. तेव्हा तो आपल्या अंगावरील शर्ट काढून टाकतो.

पण पँटची आग तशीच असते. मग तो खाली जमिनीवर बसतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत करतो पण आग काही विझत नाही. शेवटी तो धावत जातो आणि पाण्यात उडी मारतो. तेव्हा कुठे आग विझते. तेव्हा कुठे या तरुणाच्या जीवात जीव येतो.

हे वाचा - बापरे! धगधगत्या आगीत नवरा-नवरीचा 'रोमान्स'; Wedding Video पाहून सर्वांना फुटला घाम

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. सोशल मीडिया रेडिटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Fire, Viral, Viral videos