जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं...; पाहा VIDEO

तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं...; पाहा VIDEO

बाईकवर स्टंट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना.

बाईकवर स्टंट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना.

तरुणींना पाहून तरुण फिल्ममधील हीरोसारखी स्टाइल मारायला गेला आणि त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

  • -MIN READ Tamil Nadu
  • Last Updated :

चेन्नई, 06 ऑक्टोबर : हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी हीरो काय काय करतात हे तुम्ही फिल्ममध्ये पाहिलंच असेल. तरुणींना इम्प्रेस कऱण्याचा फंडा फिल्मपुरताच नाही तर रिअल लाइफमध्येही पाहायला मिळतो. किती तरी तरुण तरुणींना आपल्याकडे आकर्षित करण्याची काय काय नाही करत. काही तरुण तर अगदी फिल्ममधील हीरोसारखी स्टाइल मारायला जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तरुणींना पाहताच एक तरुण चालत्या बाईकवर स्टंट करायला गेला आणि त्यानंतर तरुणासोबत जे घडलं ते भयंकर आहे.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन तरुण बाईकवर बसून जाताना दिसतात. एक तरुण बाईक चालवतो आहे आणि एक त्याच्या मागे बसला आहे. या तरुणांच्या मागून जाणाऱ्या बाईकस्वारांनी यांचा व्हिडीओ शूट केला आहे. हे वाचा -  Shocking Video - पाय घसरला आणि काही सेकंदात गेला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला भयावह मृत्यू जशी बाईक थोडी पुढे जाते, तशी रस्त्याशेजारी बऱ्याच तरुणी दिसतात. तरुणींना पाहताच बाईकवर मागे बसलेल्या तरुणामध्ये हिरो जागा होतो. तो तरुणींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो स्टंट करायला जातो. तुम्ही पाहाल तर हा तरुण जशा तरुणी दिसतात तसा बाईकवर उभं राहायला जातो. चालत्या बाईकवर उभा राहून तो दोन्ही हात पसरतो तितक्यात…. पुढे जे घडतं ते पाहून आपल्यालाही धडकी भरते. बाईक हलू लागते, तरुणाचे पायही डगमगू लागतात. त्यानंतर तो चालत्या बाईकवरून कोसळतो आणि धाडकन रस्त्यावर आपटतो.

ज्या तरुणींसमोर तो हीरो बनत होता, त्याच तरुणींसमोर त्याची चांगलीच फजिती झालेली दिसते. त्याला पाहून तरुणी इम्प्रेस होण्याऐवजी त्याच्यावर हसू लागल्या. हिरोगिरी कसली यापुढे हा तरुण तरुणींना आपलं तोंडही दाखवणार नाही. हे वाचा -  बापरे! एकमेकांना वाचवता वाचवता घडली भयंकर दुर्घटना; अपघाताचा थरारक VIDEO Trend Talks यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना तामिळनाडूच्या कराईकुडीतील असल्याचं सांगितलं जातं आहे.  माहितीनुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. दोन्ही बाईकर्ससह त्यांचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात