जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking Video - पाय घसरला आणि काही सेकंदात गेला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला भयावह मृत्यू

Shocking Video - पाय घसरला आणि काही सेकंदात गेला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला भयावह मृत्यू

स्टंटच्या नादात गमावला जीव

स्टंटच्या नादात गमावला जीव

तरुणाच्या चुकीमुळे त्याने आपला जीव गमावला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. पण बऱ्यादा आपल्या चुकांमुळे आपण मृत्यू ओढावून घेतो. आपण स्वतःच आपल्या मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक मृत्यूचा भयावह व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे. एका तरुणाचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणाचा पाय घसरला आणि काही क्षणातच त्याला मृत्यूने गाठलं. एका चुकीमुळे तरुण मृत्यूच्या दारात पोहोचला. आपण प्रसिद्ध व्हावं असं कुणाला वाटत नाही. आता तर प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया हे सोपं माध्यम आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात युझर्स काही ना काही विचित्र करताना दिसतात. काही जण तर अगदी आपल्या जीवावर बेतेल असे स्टंटही करतात. असाच हा व्हिडीओ आहे. हे वाचा -  उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्… VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका डोंगराच्या मध्ये एक तरुण दिसतो आहे. तरुणाला नीट उभं राहायलाही जागा नाही. दगडांना टेकून तो कसाबसा उभा राहिला आहे. आता हा तरुण इथंपर्यंत गेला तरी कसा? तिथं तो काय करत होता? असे बरेच प्रश्नही आपल्याला पडतात. हा तरुण स्टंट करतो आहे. एका उभ्या डोंगरावरून उतरण्याचा प्रयत्न तो करतो आहे. त्याचवेळी कुणीतरी त्याचा व्हिडीओ बनवतो आहे.

जाहिरात

आणि ज्याची भीती होती तेच घडलं. तरुणाचा पाय घसरला आणि तो तिथून कोसळला. कुठे पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करता येईल अशी जागाही तिथं नव्हती. तरुण कोसळला तो थेट खोल दरीतच गेला. या तरुणाचं पुढे काय झालं हे या व्हिडीओत दिसत नाही पण त्याचा जीव वाचण्याची शक्यता जवळपास नाहीच. दुर्घटना पाहता त्याचा मृत्यूच झाला असावा असं दिसतं. हे वाचा -  LED TV Blast : टीव्ही पाहताना सावधान! इतकी भयानक दुर्घटना घडली की एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @YoufeckingIdiot ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहूनच सर्वांना धडकी भरली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. नेटिझन्सनी यावर कमेंट देताना आपला संताप व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात