लंडन, 01 ऑक्टोबर : एका विशिष्ट वयानंतर आपले काही दुधाचे दात पडतात आणि त्याजागी कायमचे दात येतात. म्हातारपणात काही जणांचे सर्वच दात पडतात आणि त्यांना कवळी लावण्याची वेळ येते. काही अपघातात जबड्याला मार लागल्यासही दात तुटू शकतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका व्यक्तीचे वयाच्या 29 व्या वर्षीच सर्वच्या सर्व दात पडले आहेत. तेसुद्धा खाताना. यूकेतील हे हैराण करणारं प्रकरण आहे. ब्रिस्टलमध्ये राहणारा अलेक्झांडर स्टोइलोव्ह आता 35 वर्षांचा आहे. 6 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 29 व्या वर्षी त्याचे सर्व दात पडले. त्यामुळे डॉक्टरही हैराण झाले. आपले दात खाताना पडल्याचं त्याने सांगितलं आहे आणि यामागील धक्कादायक कारणही दिलं आहे. एका वेबसाइटशी बोलताना अलेक्झांडरने सांगितलं, “मला लहानपणी दातांची कोणतीच समस्या नव्हती. मी दातांची नीट काळजी घ्यायचो. पण तरी माझे दात पडू लागले, तेव्हा मीसुद्धा हैराण झाले. तोंडाची इतकी स्वच्छता राखूनही मला दातांसंबंधी काही समस्या होऊ शकते, असं वाटलंही नव्हतं” हे वाचा - नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; फोटो पाहून धक्काच बसेल “पहिल्यांदाच माझा एक दात तुटला तेव्हा मी चपाती खात होते. त्यानंतर तीन आठवड्यांतच माझे १० दात तुटले आणि पुढील 5 वर्षांत माझे सर्व दात पडले”, असं त्याने सांगितलं. अलेक्झांडर म्हणाला, “दात तुटताना मला बिलकुल वेदना झाल्या नाही. हिरड्यांमधून रक्तही निघालं नाही. पण यानंतर मी सामान्यपणे खाऊ शकत नाही असं समजलं. मला लिक्विडच घेता येतं. मी कडक पदार्थ खाऊ शकत नाही. मला लोक नरम पदार्थ खाण्याचा सल्ला देतात पण तेसुद्धा मी चावू शकत नाही. बऱ्यादा माझी बायको मला चिकन मिक्सरमध्ये वाटून त्याचा शेक बनवून देते. पण त्याला काहीच चव नसते, त्यामुळे मी तेसुद्धा पिऊ शकत नाही. काही पदार्थांचे तर मी तुकडेच्या तुकडे गिळतो, ज्यामुळे मला पचनसंबंधी समस्या होऊ लागली आहे” हे वाचा - Oral heath : दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणाम तरुणवयातच सर्वच्या सर्व दात तुटण्यामागे नेमकं काय कारण असावं, याबाबत अलेक्झांर म्हणाला, “मला लहानपणी अँटिबायोटिक्स दिल्या होत्या, कदाचित त्याचा दुष्परिणाम असावा. ज्यामुळे माझे दात कमकुवत झाले आणि पडले. आता माझ्या तोंडात एकही दात नाही. मी याबाबत डॉक्टरांना सांगितलं. तेव्हा त्यांनी माझ्या जबड्यातील दातांना मुळापासून काढण्याचा सल्ला दिला. पण यामुळे मला जबड्याच्या हाडांमध्ये इन्फेक्शनही होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं” शिवाय आता त्याला पुन्हा सर्व दात हवे तर जवळपास 36 लाख रुपये खर्च करावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.