नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : जगाभरातील अनेकांना मासे (Fish) आवडतात. पण विचार करा, जर पाण्याऐवजी ओव्हनमध्ये (Oven) मच्छी उड्या मारताना दिसली तर काय होईल. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) होतो आहे, जो पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रियांसोबत भीतीही व्यक्त केली आहे. युजरने हॉरर चित्रपटातील घटना वाटत असल्याचं सांगत अनेकांनी या व्हिडीओवर विविध कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. हैराण करणाऱ्या या व्हिडीओमध्ये मच्छीचा एक मोठा तुकडा ओव्हनमध्ये दिसतो आहे. मासा शिजवण्यासाठी टिनफॉईलने झाकून ट्रेमध्ये ठेवण्यात आला आहे. डोकं नसलेला हा लांब तुकडा आपोआप ओव्हनमध्ये उड्या मारताना दिसतोय. माशाचा तुकडा ग्रिलवर फडफडताना दिसतोय, जसं की तो अजूनही जिवंतच आहे. हा प्रकार पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. माशाचा तुकडा इतक्या जोरात फडफडताना पाहून व्हिडीओमध्ये असणारा व्यक्तीही ओव्हनचा दरवाजा बंद-चालू करतो. परंतु थोड्या वेळाने माशाचा उड्या मारणारा तुकडा आपोआप शांत होतो.
Horror video : ‘ते’ भूत की…? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम
तब्बल 22 फूटांचा साप खाद्यांवर घेऊन जातोय हा व्यक्ती, VIDEO पाहून बसेल शॉक
हैराण करणारा हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वी यूट्यूबवर एका Naser Par नावाच्या व्यक्तीने शेअर केला होता. या व्हिडीओला 3.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु आता पुन्हा हा व्हिडीओ एका युजरने शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे.