Home /News /viral /

Horror video : 'ते' भूत की...? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम

Horror video : 'ते' भूत की...? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम

जीममधील हॉरर व्हिडीओ

जीममधील हॉरर व्हिडीओ

कोणत्याही हॉरर फिल्ममधील दृश्य वाटावं अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे.

    मुंबई, 19ऑगस्ट : अनेकांना भूतावर (Ghost) विश्वास नसतो. तर काहींच्या मते देव आहे तर भूतही (Ghost video) आहे, असं मानतात. देव-भूत आहे हे आपण मानत असू किंवा नसू पण असे व्हिडीओ (Horror video) पाहिले की अंगाचा थरकाप (Shocking video) मात्र नक्कीच उडतो.  तुम्ही बऱ्याच हॉरर फिल्म पाहिल्या असतील किंवा सोशल मीडियावर भूताचे व्हिडीओही पाहिले असतील. ते पाहताना अंगाला दरदरून घाम फुटतो. एखाद्या हॉरर फिल्ममधील भयानक दृश्यं वाटावं अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे (Real ghost). एक खरा हॉरर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये जीममध्ये एका व्यक्तीवर भूत म्हणा किंवा एखाद्या अदृश्य शक्तीने हल्ला केल्याचं दिसतं आहे. व्हिडीओ पाहताच धडकी भरेल. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण जीममध्ये आला आहे. तो जीम करण्यासाठी तयार होतो आहे. जिममध्ये तो एकटाच दिसतो आहे. हे वाचा - VIDEO - फक्त डोळे बंद करून ऐका या चिमुकल्याचा आवाज; टॅलेंट पाहून थक्क व्हाल अचानक त्याच्या मागे असलेलं TRX सस्पेंशन आपोआप मागे पुढे होताना दिसतं. या व्यक्तीला याबाबत माहिती नाही आहे, त्याचं तिथं लक्षच नाही आहे. त्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी जातो तिथं एक भलामोठा बॉल आपोआप हलताना दिसतो तेव्हा तो तरुण दचकतो. तो घाबरून आपली बॅग उचलतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. तो जसा दरवाज्याच्या दिशेने धावू लागतो तसा तो जमिनीवर पडतो. कुणीतरी त्याचा एक पाय धरून त्याला खेचतानाही दिसत आहे. कसंबसं करून तो तरुण त्या अदृश्य शक्तीच्या तावडीतून सुटतो आणि आपलं सामान तिथंच टाकून तो तिथून धूम ठोकतो. हे वाचा - खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि...; पाहा थरारक VIDEO हा व्हिडीओ @carlosruizoficial मार्फत टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. जो आता फेट डिसाइडेड युट्यूब चॅनेलवरह शेअर करण्यात आला आहे. तिथं खरंच भूत होतं का? हे खरंच पॅरानॉर्मल आहे का की सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी केलेला एक फेक व्हिडीओ? याबाबत स्पष्टता नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Horror, Viral, Viral videos

    पुढील बातम्या