मुंबई : सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे मजेदार व्हिडीओ रोज पाहिले जातात आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे माणसांच्या संबंधीत असतात, तर काही व्हिडीओ हे प्राण्यांशी संबंधीत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे हा खूपच मनोरंजक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ माकडांशी संबंधीत आहे, ज्यामध्ये माकडांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video हा एक एक्सप्रिमेंटल व्हिडीओ आहे, ज्यामध्ये माकड स्वत:ला पाहिल्यानंतर काय करतात? हे कॅमेरात कैद करण्यात आलं. यासाठी आरशाजवळ खाण्याचे पदार्थ ठेवले जातात, ज्यामुळे माकडं तेथे आकर्षित होतील. माकड देखील तेथे येतात आणि खाणं खातात. यासगळ्यात काही माकडं अशी वागतात की त्यांना काहीच फरक पडत नाही. तर एका माकडाने तर चक्क आरसाच फोडला आहे.
या व्हिडीओत वेगवेगळी माकडं दिसत आहेत, ज्यामुळे एक माकड मुद्दाम वाकून पाहात आहे की त्याला कोणी पाहातंय का? तसेच काही माकडं स्वत:ला आरशात पाहून आपला शत्रु मानत आहेत. कॅमेराच्या फ्रेममध्ये दिलेला सीन खूपच मजेदार आहे.
या फ्रेममध्ये जे काही दिसत होते, ते सगळंच फार मनोरंजक आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. हा क्यूट व्हिडीओ लोकांना त्यांचा दिवसभराचा थकवा विसरायला भाग पाडत आहे.