मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Video : सुंदर तरुणीला मदत केल्याची त्याला अशी किंमत मिळाली, पाहून तुम्ही म्हणाल, 'आता तरी हुशार व्हा!'

Video : सुंदर तरुणीला मदत केल्याची त्याला अशी किंमत मिळाली, पाहून तुम्ही म्हणाल, 'आता तरी हुशार व्हा!'

एका सुंदर तरुणीला मदत करण्याच्या चांगल्या हेतुने आलेल्या तरुणाचा गेम. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.

एका सुंदर तरुणीला मदत करण्याच्या चांगल्या हेतुने आलेल्या तरुणाचा गेम. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.

एका सुंदर तरुणीला मदत करण्याच्या चांगल्या हेतुने आलेल्या तरुणाचा गेम. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 ऑगस्ट : सोशल मीडीया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे आपल्याला कॉमेडी, क्राफ्ट, सायन्स, फूड यांसारखे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. परंतु येथे आपल्यासमोर असे देखील व्हिडीओ येतात, जे आपल्याला सावध करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जो पाहून तुम्हला व्हिडीओतील तरुणावर हसावं की रडावं हे कळणार नाही.

हो, कारण हा तरुण, एका सुंदर तरुणीला मदत करण्याच्या चांगल्या हेतुने आला होता. पण या तरुणीनं त्याच्या गेमच केला. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नक्की असं काय घडलं?

रस्त्याच्या कडेवर एक तरुणी उभी आहे, जी येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवाल्यांकडून मदत मागत आहे. परंतु कोणी थांबायला तयार नसतं. तेव्हा एक तरुण एकट्या मुलीला पाहून मदत करण्याच्या भावनेनं आपली गाडी थांबवतो आणि या मुलीला गाडीवर बसण्यासाठी सांगतो. ही तरुणी जेव्हा त्याच्या गाडीवर बसायला जाते, तेव्हा ती त्याच्या बाईकच्या सायलेंसरमध्ये एक कपडा टाकते आणि बाईकवर अशी काही बसते की, जणू तिने काहीच केलं नाही.

हा बाईक चालक तरुण जेव्हा आपली गाडी सुरू प्रयत्न करतो तेव्हा, ती सुरूच होत नाही. गाडीला  काय झालं हे पाहाण्यासाठी तो खाली उतरतो आणि मदतीसाठी फोन करायला जातो. इतक्यात ही तरुणी आपल्या साथीदाराला बोलावते आणि त्या बाईकच्या सायलेंसरमधील कपडा काढते.

हे वाचा : Video : कोणाचं लक्ष नाही हे लक्षात येताच तरुण-तरुणाचा धक्कादायक प्रकार, आधी बाईक जवळ गेले आणि मग...

ज्यानंतर हे दोघेही त्या तरुणाची फसवणूक करुन बाईक उलट्या दिशेने घेऊन पळून जातात. हे सगळं इतक्या पटापट घडतं की, त्या बिचाऱ्या तरुणाला काय घडलं हेच कळत नाही.

View this post on Instagram

हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट funtaap वरुन शेअर करण्यात आला आहे. परंतु हा व्हिडीओ नक्की कुठला आहे. हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी भरभरुन लाईक आणि कमेंट केलं आहे.

हे वाचा : Video : चोरी करण्याची 'ही' पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट

कमेंटमध्ये लोक या तरुणाच्या परिस्थीतीवर दया दाखवत आहेत. तर काही लोक हा व्हिडीओ पाहून दुसऱ्या लोकांना सतर्क राहण्यासाछी सांगत आहेत. तर काहींनी असं देखील म्हटलं आहे की, हे सगलं स्क्रिप्टेड म्हणजेच बनावट आहे.

First published:

Tags: Crime news, Viral news, Viral videos