जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : चोरी करण्याची 'ही' पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट

Video : चोरी करण्याची 'ही' पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट

Video : चोरी करण्याची 'ही' पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट

हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून आपल्या समोर आलं आहे, त्यामुळे या व्हिडीओत या व्यक्तीने चूक केली तशी चूक तुम्ही करु नका.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 24 ऑगस्ट : सोशल मीडिया हे व्हिडीओ आणि फोटोंचं भंडार आहे, येथे तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळेल, कारण अशी एकही गोष्ट नाही, जी तुम्हाला इथे सापडणार नाही. सोशल मीडिया उघडताच आपल्या समोर वेगवेगळ्या गोष्टी येताता. ज्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, ज्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका चोरीचा व्हिडीओ आहे. परंतु या व्हिडीओत चोराने ज्या प्रकारे चोरी केली आहे, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसावा. अशी झाली मोबाईलची चोरी खरंतर रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन जाणार असल्यामुळे दोन्ही बाजूला गाड्या थांबल्या आहे. या दरम्यान एक व्यक्ती बाईकवर आपल्या फोनवर बोलत थांबला आहे. परंतु तेवढ्यात एक व्यक्ती समोरच्या दिशेने येतो आणि या बाईकच्या मागे जाऊन थांबतो. खरंतर हा साधा दिसणारा व्यक्ती चोर आहे. जो समोरुन ट्रेन येण्याची वाट पाहात असतो. हे वाचा : प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी महिलेचा जीवघेणा प्रयत्न; तिने असं काय केलं? पाहा Video या चोराला जशी ट्रेन जवळ येताना दिसते, तो या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल खेचतो आणि रेल्वे क्रॉसिंग ओलांडतो. ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला, तो व्यक्ती चोराचा पाठलाग करतो, परंतु समोरुन ट्रेन येत असल्यामुळे आपल्या जीवाचा विचार करुन तेथेच थांबतो आणि याच संधीचा फायदा घेऊन चोर मोबाईल घेऊन पळून जातो. हे वाचा : Viral video : प्रसिद्धीसाठी Reels काढणाऱ्या तरुणाची एक चूक, त्याला भलतीच महागात पडली

जाहिरात

हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून आपल्या समोर आलं आहे, त्यामुळे या व्हिडीओत या व्यक्तीने चूक केली तशी चूक तुम्ही करु नका आणि सार्वजनीक ठिकाणी सावध राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात