मराठी बातम्या /बातम्या /Viral /what is warewolf : लांडगे माणसाच्या रक्तासाठी तडफडतात, म्हणून पौर्णिमेच्या चंद्रावर खरंच गुरगुरतात? जाणून घ्या सत्य

what is warewolf : लांडगे माणसाच्या रक्तासाठी तडफडतात, म्हणून पौर्णिमेच्या चंद्रावर खरंच गुरगुरतात? जाणून घ्या सत्य

लांडगे माणसाच्या रक्ताचे तहानलेले असतात, ते पौर्णिमेच्या चंद्रावर खरंच गुरगुरतात? जाणून घ्या सत्य

लांडगे माणसाच्या रक्ताचे तहानलेले असतात, ते पौर्णिमेच्या चंद्रावर खरंच गुरगुरतात? जाणून घ्या सत्य

‘लांडगा आला रे आला’ नावाची एक कथा लहानपणी तुम्ही ऐकलीच असेल. त्याच लांडग्यांवर आधारित अनेक चित्रपट बनत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर : ‘लांडगा आला रे आला’ नावाची एक कथा लहानपणी तुम्ही ऐकलीच असेल. त्याच लांडग्यांवर आधारित अनेक चित्रपट बनत आहेत. नुकताच वरुण धवन आणि क्रिती सेनन अभिनीत 'भेडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुणला लांडगा चावतो आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वरुण लांडगा बनतो. तसंच तो भ्रष्टाचारी लोकांना मारतो आणि खातो अशी कथा दाखवली आहे. प्राण्यांवर आधारित असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. पण या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लांडगा चावल्यावर माणूस खरंच लांडगा बनतो का, या शिवाय लांडग्याशी संबंधित अनेक चर्चा होतात, तर त्या खऱ्या आहेत का, त्यात तथ्यं आहेत का, हे जाणून घेऊयात. या संदर्भात ‘एबीपी लाईव्ह’ने वृत्त दिलंय.

वेअरवूल्फ म्हणजे काय?

जो माणूस लांडगा बनतो, त्या बदललेल्या अशा व्यक्तीला वेअरवूल्फ असं नाव देण्यात आलं आहे. वेअरवूल्फबद्दल जगात अनेक गोष्टी प्रचलित आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2400 वर्षांपूर्वीच्या इतिहासात वेअरवूल्फचा पहिला उल्लेख आढळतो. ग्रीक पौराणिक कथांपासून ते 18 व्या शतकापर्यंत जगातील अनेक संस्कृतींमध्ये वेअरवूल्फ म्हणजेच लांडग्याचा उल्लेख आढळतो.

हे ही वाचा : अजगराचा 5 वर्षाच्या मुलावर हल्ला, त्याला स्विमिंग पूलमध्ये ओढलं आणि मग...

वेअरवूल्फशी संबंधित घटना

1541 मध्ये इटलीतील एका गावातील लोक अचानक गायब होऊ लागले होते. तपासाअंती चौकशी केली असता एका शेतकऱ्याने माणसांचं मांस खाण्यासाठी लोकांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. या शेतकऱ्याला विचित्र आजार असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे तो स्वत:ला वेअरवूल्फ समजून लोकांना खात असे आणि लांडग्यासारखं वागत असे. वैज्ञानिकदृष्ट्या ही गोष्ट सिद्ध झाली नाही आणि त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली होती.

14 डिसेंबर 1598 रोजी पॅरिस कोर्टात एक केस आली, ज्यामध्ये एका व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली हजर करण्यात आलं होतं. या व्यक्तीने एवढ्या भीषण रीतीने खून केला होता की, न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं नष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्या व्यक्तीला जाळून मारण्याची शिक्षा सुनावली होती.

1640 मध्ये, जर्मनीतील ग्रीफ्सवाल्डमध्येही वेअरवूल्फची दहशत होती. अंधारात बाहेर पडणाऱ्या कोणत्याही माणसाला वेअरवूल्फ मारून टाकायचा असं म्हटलं जात होतं. दहशत खूप वाढल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने हिंमत करून रात्री गर्दी जमवून ही भीती संपवली होती.

1685 मध्ये, बव्हेरियन शहरात एका लांडग्याने दहशत निर्माण केली होती. तिथल्या लोकांना असं वाटत होतं की शहराचा मेअर रात्रीच्या वेळी वेअरवूल्फ म्हणून फिरतो. एकेदिवशी जमावाने हिंमत करून त्याला मारून टाकलं, त्यानंतर त्या लांडग्याचं कातडे स्थानिक संग्रहालयात ठेवलं होतं.

हे ही वाचा : एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

लांडग्यांशी संबंधित काही दंतकथा लांडगे मानवी रक्ताचे तहानलेले असतात

लांडगे माणसाच्या रक्ताचे तहानलेले असतात, असं अनेक कथांमध्ये म्हटलं जातं. परंतु माणूस आणि लांडगे एकाच ठिकाणी एकत्र राहू शकतात. त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे बरोबर मानली जाऊ शकत नाही, असं प्राणी संरक्षक म्हणतात.

लांडगे चंद्रावर गुरगुरतात

चंद्राला पाहून लांडगे गुरगुरतात, असं म्हटलं जातं त्याचं कारण, रात्री लांडगे जेव्हा गुरगुरतात तेव्हा ते आपलं डोकं वर करतात. शास्त्रज्ञांच्या मते आपला आवाज स्पष्ट यावा, यासाठी ते असं करतात, त्यांचा चंद्राशी काहीच संबंध नाही.

लांडगे कळपात येतात

‘शेर अकेला ही आता है, झुंड में तो भेड़िए आते हैं’ हा डायलॉग तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ऐकला असेल. पण कधीकधी लांडग्यालाही एकटं राहावं लागतं. अशा लांडग्याला ‘अलोन वूल्फ’ म्हणतात.

लांडगे जोडीदाराशी एकनिष्ठ असतात

लांडग्यांशी संबंधित ही गोष्ट अफवा नाही. लांडगे आयुष्यात फक्त एकच जोडीदार बनवतात आणि त्यांच्यासोबत राहतात आणि बहुतांश लांडगे त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात.

First published:
top videos

    Tags: Moon