नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : तुमच्याकडे नासाच्या (NASA Fake Photo) नावाने दिवाळीत (Diwali Image) काढलेला फोटो आला आहे का? हा तो फोटो आहे जो दरवर्षी दिवाळीच्या दिवसात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल होतो. पण खरंच दिवाळीच्या दिवसात भारत (Indian) असाच दिसतो का? याबाबत पीआयबीने फॅक्ट चेक (Fack check) करीत नासाच्या फोटोबाबत विचारणाऱ्यांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक मीम पोस्ट केलं आहे. मीम पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये एक संदेश दिला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दहा दिवसांपूर्वी हँडलने 10 नोव्हेंबर रोजी या फोटोबाबत पोस्ट शेअर केली होती. पीआयबीने एक व्हायरल फोटो शेअर करीत लिहिलं की, आम्हाला माहीत आहे की दिवाळी प्रकाश, दिवे आणि गोड-धोडाचा सण आहे. याशिवाय दिवाळी अपूर्ण आहे आणि या नासाच्या फोटोशिवायदेखील.
When we get the queries asking us to #FactCheck the viral NASA image again, and again, and again…#BurstFakeNews https://t.co/Fng4AkRdtb pic.twitter.com/feECirLBk2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 15, 2020
हे ही वाचा- विराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला; ट्रोलर्सनी पत्नी अनुष्कालाही सुनावलं दिवाळीपूर्वी आम्ही या फोटोचं फॅक्ट चेक केलं होतं. नासाने ट्विट करीत लिहिलं होतं की, आम्ही नवव्यांदा सांगत आहोत की, हा फोटो नासाने रिलीज केलेला नाही. पीआयबीने फॅक्ट चेकसह शेअर केलेल्या मीममध्ये लिहिलं की, आज 450 हून अधिक लाइक्स आणि खूप प्रतिक्रिया एकत्रित केल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, मीदेखील हा फोटो पाहून दमलो आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, सर्वाधिक माझे नातेवाईक हा फोटो पाठवतात आणि लोकांना गोंधळात टाकतात.