नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. कोहलीने दिवाळीच्या (Diwali 2020) निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या या सणाच्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच त्यांनी चाहत्यांना फटाके न फोडण्यासाठी अपील केलं होतं. मात्र त्यांचा हा संदेश त्यांची पत्नी अनुष्का शर्मावर (Anushka Sharma) भारी पडला होता.
मात्र कोहलीने चाहत्यांना प्रकाशाच्या या सणाच्या निमित्ताने प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके न फोडण्यासाठी अपील केलं होतं, मात्र परंतु या मेसेजवर अनेक चाहते संतप्त झाले आहेत. आणि कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही ट्रोलिंगला सुरुवात केली. यानंतर, ट्विटरवर कोहलीच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, जो त्याने या महिन्याच्या सुरुवातीला दुबईमध्ये आपल्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर साजरा केला होता.
Mr. @imVkohli we are your fan ...fan of your game fan for your contribution for the nation....but please please don't be hypocrite and don't preach us ......on Cramer bursting or on our any holy festivals....mind it...🙏🙏🙏🙏 https://t.co/EFKZiZrj4U
कोहलीच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ आरसीबीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली अनुष्कासोबत केक कापण्यापूर्वी पहिल्यांदा बॅकग्राऊंडवर फटाके फोडताना दिसत आहे. ट्रोलर्सने हा व्हिडीओ कोहलीच्या दिवाळी संदेशाच्या व्हिडीओला कोहलीच्या दिवाळी संदेशाच्या व्हिडीओसह जोडून खूप ट्रोल केलं आहे.