मुंबई, 11 जून : फोटो पाहताच, वा! काय डोले-शोले आहेत, असंच तुम्ही म्हणाल. अशी बॉडी (Body) नेमकी कुणाची आहे, हे पाहण्याची उत्सुकताही तुम्हालाही असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ही अशी बॉडी कोणत्या माणसाची नाही तर प्राण्याची आहे. आता हा प्राणी कोण (Bodybuilder animal)? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. असा बॉडीबिल्डर प्राणी तुम्ही एखाद्या कार्टुन फिल्ममध्ये पाहिला असाल. पण प्रत्यक्षात कदाचित नाहीच. त्यामुळे हा प्राणी कोण आहे, हे जाणून घेण्याची तुम्हालाला नक्कीच उत्सुकता आहे. तर हा प्राणी आहे कांगारू (Bodybuilder kangaroo).
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू उंच उडीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता उंच उडी मारणाऱ्या या कांगारूचं असं हे पिळदार शरीर पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा कांगारू त्याच्या उंच उडीसाठी नाही तर त्याच्या शरीरयष्टीमुळे चर्चेत आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - सिंहाच्या कळपात एकटी भिडली आई; सिंहिणीच्या जबड्यातून म्हशीने वासराला खेचून आणलं व्हिडीओत पाहू सकता एक कांगारू आपल्या दोन पायांवर उभा आहे. त्याचं शरीर पाहून तुम्हालाही शॉक बसेल. पुढील दोन हात पाहाल तर एखाद्या बॉडीबिल्डरसारखेच आहेत. फक्त हाथच नाही शोल्डर, चेस्ट, बायरेप्सस, ट्रायसेप्स सर्वकाही बॉडीबिल्डरसारखेच आहेत. या कांगारूला पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. हे वाचा - नवरी राहिली बाजूला मेहुणीने मारला चान्स; नवऱ्यासोबतचा VIDEO पाहून तुम्हीही उडाल या कांगारू त्याच्यासमोरील व्यक्तीला आपल्या दोन्ही हातात धरतो आणि आपल्याकडे खेचतो. ही व्यक्तीसुद्धा तुझं शरीर माझ्यापेक्षा खूप मजबूत आहे, असं म्हणते. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.