नवी दिल्ली 12 जून : जंगलातील प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला अनेकांना आवडतं. याच कारणामुळे अनेकजण जंगलात फिरण्यासाठीही जात असतात. जंगलात अनेकदा अशी दृश्य पाहायला मिळतात, जी पाहून कोणीही हैराण होईल. त्यामुळेच असं म्हटलं जातं, की जंगलात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर याच गोष्टीचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही हत्ती (Elephant) पाणी पिण्यासाठी गेले आहेत. मात्र, याचवेळी मगर यातील एका हत्तीवर हल्ला करते. मगर इतका अचानक हल्ला करते की हत्तीला काही कळण्याच्या आत मगर त्याची सोंड पकडते आणि हत्तीला आत ओढू लागते. हत्ती आपली सोंड मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, मात्र मगर त्याची सोंड सोडत नाही. मगर या लहान हत्तीवर भयंकर हल्ला करते. यामुळे, तो जोरजोरानं ओरडू लागतो. हे सर्व पाहून एक मोठा हत्ती त्या हत्तीच्या मदतीला धावून येतो आणि मगरीला दूर पळवून लावतो. आयआरएस ऑफिसर अंकुर यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे, की कधीही एकटेच पाणी पिऊ नका. या व्हिडिओमधून आणखी एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे या कठीण काळात हत्तींनी एकमेकांची साथ सोडली नाही.
Never drink Alone..
— Ankur Rapria, IRS (@irsankurrapria) June 11, 2021
Via sm@ParveenKaswan @ipskabra pic.twitter.com/n6lNkBRo7z
घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याचा बिबट्यानं पाडला फडशा, नाशिकमधील घटनेचा VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरनं म्हटलं, की खरंच या छोट्या हत्तीचा जीव वाचणं कठीण होतं. बरं झालं, मोठ्या हत्तीनं वेळेवर येऊन त्याचा जीव वाचवला. तर, एका दुसऱ्या युजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ पाहून हे शिकायला मिळतं, की कधीच संकटाच्या काळात आपल्या लोकांचा हात सोडू नये.