• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • GK च्या प्रश्नांची उत्तरं दिल्यास Free e-rickshaw ride; रिक्षाचालक 'अद्भुत टोटोवाला'ची भन्नाट ऑफर

GK च्या प्रश्नांची उत्तरं दिल्यास Free e-rickshaw ride; रिक्षाचालक 'अद्भुत टोटोवाला'ची भन्नाट ऑफर

 • Share this:
  कोलकाता, 23 नोव्हेंबर : तुम्ही एखाद्या गाडीतून प्रवास करत असाल आणि तुम्हाला हा प्रवास मोफत करायला मिळेल, असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही आनंद होईल. एक ई-रिक्षा ड्रायव्हरही (e rickshaw driver) आपल्या प्रवाशांना अशी भन्नाट ऑफर (e rickshaw driver offer)  देतो आहे. पण त्याने एक अट ठेवली आहे. ज्यासाठी तुम्हाला नीट अभ्यास करूनच जावा लागेल. रिक्षातून मोफत राइड (West bengal free e rickshaw ride)  मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज पक्कं करावं लागेल (West bengal e rickshaw driver asked gk question). पश्चिम बंगालमधील (West bengal) हा ई-रिक्षा ड्रायव्हर त्याच्या रिक्षात बसलेल्या प्रवाशांना  जनरल नॉलेजचे प्रश्न विचारतो (Answer GK question and get free e rickshaw ride). त्याची उत्तरं योग्य दिली तर त्या प्रवाशांकडून तो रिक्षाचं भाडं घेत नाही. त्यांना आपल्या रिक्षात फ्री राइड देतो. सोशल मीडियावर या रिक्षावाल्याची चर्चा सुरू आहे. हावडा जिल्ह्यातील लिलुहामध्ये राहणारा हा रिक्षाचालक. सुरंजन कर्मकार (Suranjan Karmakar) असं त्याचं नाव आहे फेसबुकवर त्याची स्टोरी व्हायरल होते आहे. संकलन सरकार नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर ही स्टोरी शेअर केली आहे. हा रिक्षाचालक सामान्य ज्ञानाशी संबंधित 15 प्रश्न विचारतो. हे वाचा - भीक मागून पोट भरते पण बोलते फाडफाड इंग्रजी; महिलेचा VIDEO पाहून तोंडात बोट घालाल संकलनने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो एका सुरंजनच्या ई-रिक्षाने रंगोली मॉलकडे जात होता. त्यावेळी सुरंजनने त्याला सांगितलं की जर त्याने त्याच्या 15 प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर तो त्याच्याकडून रिक्षाचं भाडं घेणार नाही. हे ऐकताच संकलनला आश्चर्य वाटलं. जर एकाही प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं नाही तर रिक्षाचालक आपल्याकडून दुप्पट भाडं तर घेईल असंच संकलनला वाटलं. त्यामुळे संकलनने रिक्षाचालकाला प्रश्न विचारण्यास सांगितलं पण तरी त्याने आपण भाडं देणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या भारताचं राष्ट्रगीत कुणी लिहिलं, पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, श्रीदेवीच्या जन्माची तारीख, पहिली टेस्ट ट्युब बेबी असे 15 प्रश्न सुरंजनने संकलनला विचारले. त्यापैकी दोन-तीन प्रश्न सोडून संकलनने बाकी प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. हे वाचा - बापरे! CCTV कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भयानक दृश्य; Video पाहूनच फुटेल घाम त्यानंतर सुरंजनने संकलनला सांगितलं आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आपल्याला सहावीनंतर शिक्षण सोडावं लागलं. पण तो दररोज रात्री दोन वाजेपर्यंत जनरल नॉलेजबाबत वाचतो. ललिया बुक फेअर फाऊंडेशनचा तो सदस्यही आहे. सुरंजन हा अद्भुत टोटोवाला म्हणजे अद्भुत ऑटोवाला म्हणूनही प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये ई-रिक्षाला टोटो म्हटलं जातं.
  Published by:Priya Lad
  First published: