मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भीक मागून पोट भरते पण बोलते फाडफाड इंग्रजी; महिलेचा VIDEO पाहून तोंडात बोट घालाल

भीक मागून पोट भरते पण बोलते फाडफाड इंग्रजी; महिलेचा VIDEO पाहून तोंडात बोट घालाल

रस्त्यावरील या महिलेचं इंग्रजी ऐकाल तर थक्क व्हाल.

रस्त्यावरील या महिलेचं इंग्रजी ऐकाल तर थक्क व्हाल.

रस्त्यावरील या महिलेचं इंग्रजी ऐकाल तर थक्क व्हाल.

  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 23 नोव्हेंबर : दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, असं म्हणतात त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात रस्त्यावर भीक मागून पोट भरणारी एक महिला फाडफाड इंग्रजी बोलते आहे (Beggar woman speaks fluent english). महिलेचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. महिलेचं इंग्रजी ऐकून तोंडात बोटंच घालाल.

प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असतं, जे जगासमोर आलेलं नसतं. असंच या महिलेचंही आहे. या महिलेच्या दिसण्यावर तुम्ही बिलकुल जाऊ नका. रस्त्यावर भीक मागणारी ही महिला फ्लुएंट इंग्रजी बोलते. शिकलेल्या काही लोकांनाही नीट इंग्रजी बोलता येत नाही. किती तरी जण कसंबसं मोडकंतोडकं इंग्रजी बोलतात. त्यामुळे या महिलेचं इंग्रजी बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे.

शारदा अविनाश त्रिपाठी नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे वाचा - Shocking video: फ्रिजरमधून मृतदेह बाहेर काढताच हलू लागला; डॉक्टरांनाही फुटला घाम

या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव स्वाती आहे. वाराणसीच्या अस्सी घाटावर ती राहते. तीन वर्षांपूर्वी ती वाराणसीत आली होती. तिला पाहताच ती मानसिक रुग्ण असल्याचं लोकांना वाटतं, पण ती मानसिकरित्या पूर्णपणे निरोगी आहे. एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीराची डावी बाजू पॅरालाइज्ड झाली. आपलं पोट भरण्यासाठी तिला भीक मागावी लागते.

हे वाचा - जीव वाचवणारा ACCIDENT; एक अपघातही कशी वाचवू शकतो लाइफ पाहा घटनेचा LIVE VIDEO

स्वाती ही भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असली तरी ती सुशिक्षित आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये तिने ग्रॅज्युएट केलं आहे. तिला पुनर्वसन नाही तर आर्थिक मदतीची गरज आहे.  आपल्याला पैस नको पण काम मिळवून द्या, असं ती म्हणते. चांगली नोकरी मिळावी आणि चांगलं आयुष्य जगायला मिळावं, अशी इच्छाही स्वातीने व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Uttar pradesh, Viral, Viral videos