Home /News /videsh /

बाई आवरा स्वत:ला! डिस्काउंटसाठी महिला न्यायाधीशांनी सोशल मीडियावर टाकले सेक्सी फोटो

बाई आवरा स्वत:ला! डिस्काउंटसाठी महिला न्यायाधीशांनी सोशल मीडियावर टाकले सेक्सी फोटो

न्यायाधीशांना समाजात मोठं स्थान असतं. पण केवळ डिस्टाउंट (Discount) मिळवण्यासाठी त्यांनी असे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

    बोगोटा 07 ऑक्टोबर: भारतामध्ये न्यायाधीशांना आदर दिला जातो. ते कायद्याचे जाणकार असल्याने त्यांना समाजामध्ये सन्मानाचं स्थान दिलं गेलं आहे. पण कोलंबियामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. फर्स्ट म्युनिसपल क्रिमिनल जज व्हिव्हियन पोलनिया ( Criminal Judge Vivian Polania) यांनी कपडे खरेदीवर वेबसाइट्सकडून डिस्काउंट मिळवण्यासाठी चक्क केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेले त्यांचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो जेव्हा एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले तेव्हा प्रशासन आणि इतर न्यायाधीशांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. जज व्हिव्हियन पोलनिया यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे त्याची नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या झालेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. द सन या वृत्तपत्रानुसार , न्यायाधीश व्हिव्हियन पोलानिया यांच्याकडे असे पद आहे की त्या पदाच्या काही मर्यादा आहेत. सामान्य लोक त्याच्याकडे खूप अपेक्षेने न्याय मिळेल म्हणून येतात. पोलानिया यांच्या अशा वागण्यामुळे लोकांचा न्यायपालिकेवर विश्वास उडेल. या पदाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे असे आरोप केले जात आहेत.  व्हिव्हियन यांचा फोटो कोलंबियाच्या कैकटा शहरामधील एक वर्सिटाइल जज अशा मथळ्याखाली एका वृत्तपत्राने छापला होता. न्यायाधीशांचे अनेक फोटो  इन्स्टाग्रामवर व्हिव्हियन यांनी एका मुलाखतीत सांगितले की न्यायाधीश झाल्यानंतरही मी माझी क्रॉस फिट वापरण्याची आवड जोपासते. मी असे अनेक  फोटो ऑनलाइन पोस्ट करायचे, ज्यामुळे फॉलोवरची संख्या वाढत जायची. तसेच अनेक मोठे ब्रँडही माझ्या संपर्कात आल्याने मला कपड्यांवर भरपूर डिस्काउंट मिळत होतं. इन्स्टाग्रामवर पोनोलिया यांचे  @vivianpolaniaf  या नावाचे हॅन्डल आहे पण सध्या चौकशी असल्याने हे अकाऊंट बंद आहे. मुलाखत छापून आल्यानंतर जजशिप सुपीरिअर काऊंन्सिल सेक्शनने यावर आक्षेप नोंदवून चौकशीचे आदेश दिले आहेत. काऊंन्सिलचं म्हणणं आहे की, असे वागून पोलनिया यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यांनी खाजगी आणि सामाजिक जीवनात असे काम केले आहे की लोकांचा त्याच्यावरील विश्वास कमी होणार आहे. आतापर्यंत त्यांचे इन्स्टाग्राम वर 90 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Instagram, PHOTOS VIRAL

    पुढील बातम्या