व्हिडीओत पाहू शकता नवरा आणि नवरीच्या मध्ये एक तरुण उभा आहे. हा नवरदेवाचा मित्र आहे. त्याने नवरीसाठीसुद्धा एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे. तो आपल्या हाताने स्टेजवरच ते गिफ्ट खोलतो. हे वाचा - VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी गिफ्टची पॅकिंग पाहूनही हैराण व्हाल. गिफ्ट खोलायचा इतका वेळ लागतो की असं वाटतं यात काहीतरी मौल्यवान वस्तू असावी. अखेर शेवटी एक छोटासा बॉक्स उघडतो. त्यातून जे गिफ्ट तो काढतो ते पाहून तुम्ही हैराणच व्हाल. या बॉक्समधून चक्क बाहेर पडते ती दुधाची बाटली. नवरदेवाचा मित्र आपल्या हातात ती दुधाची बाटली घेऊन नवरीसमोर धरतो. पण ते पाहताच नवरी लाजते. लाजेने गुलाबी होते. ती ते गिफ्ट हातात तर घेत नाहीच पण आपली मान लाजेने फिरवते. फक्त नवरीच नाही तर नवऱ्याची प्रतिक्रियाही तुम्ही पाहू शकता. नवरासुद्धा आपली मान मागे फिरवतो. स्टेजवरील बाकी लोक मात्र हसू लागतात. हे वाचा - बायकोसोबत असं अपेक्षित नव्हतं; मोबाईलवेड्या नवऱ्याचा प्रताप CCTV मध्ये कैद official_niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video