नवी दिल्ली 27 मे : जगात जितके देश आहेत, तितक्याच विचित्र मान्यता आणि परंपरा आहेत. यातील काही गोष्टी अशा असतात ज्याबद्दल इतर देशांतील लोकांना कळताच त्यांना आश्चर्य वाटतं. मात्र या समजुतींवर त्या ठराविक देशातील लोक वर्षानुवर्षे विश्वास ठेवतात आणि आजही ते पाळतात. आज आम्ही ज्या देशाबद्दल सांगणार आहोत, तिथे कोणत्याही कार्यक्रमासाठी उशिरा पोहोचणं चांगलं मानलं जातं. तर, लवकर पोहोचणाऱ्यांना तितका आदर मिळत नाही (Weird Tradition of Getting Late in Functions). VIDEO - फक्त सफरचंदांना बोट लावून हिरो बनले आजोबा; झाला World Record दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते (Arriving late in Venezuela) जी अतिशय अजब आहे. आपल्या देशात उशिरा येणाऱ्यांना अनेकदा तुच्छतेनं पाहिलं जातं. जेव्हा लोक लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी उशीरा येतात तेव्हा यजमान नाराज होतात. परंतु व्हेनेझुएलामध्ये उलट आहे. कारण इथे उशिरा येणाऱ्यांचा आदर केला जातो. इथले लोक अजिबात वक्तशीर नाहीत असं मानलं जातं. तिथे प्रत्येक कामाला 15 मिनिटं ते 1 तास उशीर होणं हे सामान्य आहे आणि त्याबद्दल कोणी आक्षेपही घेत नाही. उलट उशिरा येणं हा इथल्या परंपरेचा एक भाग आहे. काही रिपोर्ट्सनुसार, जर एखादा कार्यक्रम सकाळी 8 वाजता सुरू व्हायचा असेल तर तो 9 किंवा 10 वाजता सुरू होतो. इथल्या लोकांनी उशिरा जाण्याचे फायदेही मिळतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर ते एखाद्या पार्टीत उशिरा पोहोचले तर त्यांना त्याबद्दल माफी मागायची गरज पडत नाही. जगातील सर्वात श्रीमंत 7 प्राण्यांबद्दल जाणून वाटेल आश्चर्य, आहेत इतक्या संपत्तीचे मालक आता या विचित्र समजुतीचं कारण काय असा प्रश्न पडतो. ऑडी वेबसाइटच्या अहवालानुसार, लवकर आगमन हे सूचित करतं की पाहुणे लोभी आणि अधिक उत्सुक आहेत. उशिरा येण्याचा फायदा असाही होतो की जर यजमानाने तयारी पूर्ण केली नसेल तर त्या काळात त्याला तयारी करण्याची संधी मिळते.उशीर होण्याचा अर्थ असा नाही की लोक एकमेकांच्या वेळेचा आदर करत नाहीत. इतरांचा वेळ वाया जाऊ नये याकडे लोक लक्ष देतात. ओप्रा वेबसाइटच्या वृत्तानुसार, अनेक अमेरिकन पत्रकारांनी नमूद केलं की जेव्हा ते व्हेनेझुएलामध्ये गेले तेव्हा त्यांना या विचित्र प्रथेचं पालन करण्यास बराच वेळ लागला, परंतु ते हळूहळू हे शिकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.