कराची, 26 मे : बहुतेक मुलं शाळेत गेल्यवर ए फॉर अॅपल हा पहिला शब्द शिकतात. शिवाय सफरचंद हे फळ बहुतेक घरांमध्ये असतंच. कित्येक लोक दररोज आवर्जून सफरचंद खातात. पण याच सफरचंदाने एका आजोबांना हीरो बनवलं आहे. सफरचंदाला फक्त बोट लावून आजोबा जगात फेमस झाले आहेत. त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे (70 Year old man crush apple with thumb).
तुम्ही-आम्ही दररोज पाहत असलेल्या, खात असलेल्या या साध्या सफऱचंदासोबत 70 वर्षांच्या व्यक्तीने असं काही करून दाखवलं की त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. नसीमउद्दीन असं या व्यक्तीचं नाव आहे. पाकिस्तानात राहणारे नसीमउद्दीन यांची सफरचंदामुळे गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे (70 Year old man apple crush world record).
आता तुम्ही म्हणाल सफरचंद तर आम्हीही नेहमी हातात घेतो, मग नसीम यांनी सफरचंदाला फक्त बोट लावल्याने वर्ल्ड रेकॉर्ड कसा काय होईल. तर नसीम यांनी सफरचंद फक्त आपल्या बोटांनीच फोडून दाखवलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण
सफरचंद तसं नरम. म्हणजे चाकू-सुरीने ते लगेच कापलं जातं. पण तुम्ही कधी हातांनी-बोटांनी सफरचंद फोडण्याचा प्रयत्न केला आहे का? केला असेल तर त्यासाठी किती ताकद लागते हेसुद्धा तुम्हाला माहिती असेल. वयाच्या सत्तरीत तर हातात इतकं बळ असण्याची शक्यता कमीच. पण नसीम यांनी मात्र हे करतब केलं आहे. त्यांनी फक्त आपल्या एका हाताच्या अंगठ्यानेच सफरचंद फोडली आहेत.
व्हिडीओत पाहू शकता ते आपल्या एका हातात सफरचंद घेतात आणि त्यात फक्त अंगठा घुसवून त्याचे तुकडे करतात. पाहता पाहता भराभर ते अशा किती तरी सफरचंदाचे तुकडे करताना दिसतात. एका मिनिटात तब्बल 21 सफरचंदा त्यांनी अंगठ्यांनी तुकडे केले आहेत. 22 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी हे करतब करून संपूर्ण जगाला थक्क केलं.
हे वाचा - कायच्या काय! कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक
नसीम एक वेल्डर आहेत. कित्येक वर्षांपासून ते लोखंडाचं काम करतात. त्यामुळे त्यांचे हात मजबूत झाले आहेत आणि याचीच मदत त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात झाल्याचं ते सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Record, Viral, Viral videos, World record