जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रेम जडलं अन् विषय संपला; चक्क सूनेला घेऊन पळून गेला सासरा, मग मुलाने केलं हे काम

प्रेम जडलं अन् विषय संपला; चक्क सूनेला घेऊन पळून गेला सासरा, मग मुलाने केलं हे काम

फाईल फोटो

फाईल फोटो

एक व्यक्ती आपल्या सुनेच्या प्रेमात पडला आणि तो तिच्यासोबत पळून गेला. वडील पत्नीसह घरातून निघून गेल्याचं मुलाला समजताच त्याने पोलिसांना माहिती दिली. वडिलांनी पळून जाण्यासाठी दुचाकी चोरल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जयपूर 06 मार्च : प्रेमाला मर्यादा किंवा बंधन नसतं. यामुळेच ‘प्रेम आंधळं असतं’ असं लोक म्हणतात पण प्रेमात तुम्ही किती मर्यादा ओलंडता, हेदेखील महत्त्वाचं ठरतं. प्रेमाचे काही नियम आहेत का? आम्‍ही तुम्‍हाला एका घटनेबद्दल सांगतो, जिच्‍याबद्दल ऐकून तुम्‍ही हैराण व्हाल. राजस्थानमध्ये एका व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. तो व्यक्ती आपल्या मुलाच्या पत्नीसह पळून गेला.जेव्हा लोकांना हे समजलं तेव्हा सगळेच शॉक झाले. कोट्यधीश होण्यासाठी आजीबाईंनी केला विचित्र ‘उद्योग’, कुटुंबीय गेले सोडून इतकंच नाही तर सुनेला सहा महिन्यांची एक मुलगीही होती, जिला ते घरीच सोडून गेले. महिलेच्या पतीने आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. ज्यात एक व्यक्ती आपल्या सुनेच्या प्रेमात पडला आणि तो तिच्यासोबत पळून गेला. वडील पत्नीसह घरातून निघून गेल्याचं मुलाला समजताच त्याने पोलिसांना माहिती दिली. वडिलांनी पळून जाण्यासाठी दुचाकी चोरल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुंदी जिल्ह्यातील सिलोर गावातील ही घटना आहे. पीडित पवन वैरागी यानी वडील रमेश वैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी पत्नीला त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला.

News18लोकमत
News18लोकमत

तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नसल्याचा दावा पवनने केला. पवनला सहा महिन्यांची मुलगी आहे. रमेशचा यापूर्वीही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा त्यानी केला. पवनचा दावा आहे की त्याच्या वडिलांनी त्याची गाडी चोरली आणि पत्नीला घेऊन गेले. शिवाय, त्याने दावा केला की त्याचे वडील आपल्या पत्नीची फसवणूक करत आहेत आणि ती निर्दोष आहे. पवनने मान्य केलं, की आपल्या कामामुळे तो गावापासून दूर राहात असे. सदर पोलीस ठाण्याचे प्रमुख अरविंद भारद्वाज यांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचं सांगितलं. अधिकारी अरविंद पवनला आश्वासन देतात की तपास सुरू आहे आणि जोडप्याचा आणि त्यांच्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या ठावठिकाणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही नवीन माहिती दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात