पैसे कमवण्यासाठी सध्या अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोशल मीडियामुळे त्यात भरच पडते आहे. सध्याच्या काळात झटपट पैसे कमवण्याकडे लोकांचा कल आहे. कमी कष्टातून जास्त कमाई मिळवण्यासाठी लोक वाट्टेल ते करतात. अशावेळी चुकीच्या मार्गांचा अवलंबही केला जातो. मात्र मिळणाऱ्या पैशांपुढे त्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. काहीवेळेला याचे गंभीर परिणाम होतात. अगदी कुटुंबियांनाही त्याचा फटका बसू शकतो. अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील पोर्टलँडमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय आजीनंही असंच काहीसं केलं. त्यामुळे आज तिची मुलं, सुना तिला सोडून गेले आहेत. डेलीस्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, रूबी लिन एक अॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहेत. रूबी लिन 56 वर्षांच्या असून, त्यांना 9 मुलं आहेत. ओन्लीफॅन्स सबस्क्रिप्शन साईटवर त्या अॅडल्ट कंटेंट बनवतात. या शिवायही त्या एक विचित्र व्यवसाय करतात. तो व्यवसाय इतका विचित्र आहे, की त्याचा फटकाही त्यांना बसला आहे. त्या स्वतःच्या जुन्या पँटीज ऑनलाईन विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांची अंतर्वस्त्र वाटेल त्या किमतीला खरेदी करण्यासाठी लोकं तयार असतात. तरुणीने प्रपोजल नाकारल्याने भडकला युवक; तिच्या BF च्या घरी गिफ्ट बॉक्समध्ये पाठवला बॉम्ब, उघडताच… उत्पन्न वाढवण्यासाठी केला ‘हा’ व्यवसाय रूबी यांच्या म्हणण्यानुसार, त्या आधी सोशल वर्क करत होत्या. त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या वापरलेल्या पँटी विकायला सुरुवात केली. त्यांची एक पँटी सुमारे 2800 रुपयांनाही विकली गेली आहे, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आता त्या ओन्लीफॅन्स वेबसाईटवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मॉडेल्सपैकी एक बनल्या आहेत. या व्यवसायातून त्यांचं उत्पन्न वाढलं असलं, तरीही त्यांना खासगी आयुष्यात त्याचा भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यांच्या व्यवसायाबाबत मुलगा व सुनेला समजलं तेव्हा ते नाराज झाले. मुलगा आणि सून झाले नाराज त्यांच्या या व्यवसायाबाबत कुटुंबियांना सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्याआधीच त्यांना कळालं. त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीला अॅडल्ट साईटच्या जाहिरातींमध्ये रूबी यांचा फोटो दिसला. तिनं त्याचा स्क्रिनशॉट घेऊन सगळ्यांना पाठवला. यामुळे रूबी यांच्या संपूर्ण कुटुंबाला या व्यवसायाबाबत माहिती मिळाली. त्यांच्या मुलीनं आईला समजून घेतलं. मात्र एक मुलगा व सून नाराज झाले. त्यांनी त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2021 पासून त्यांनी नातवंडांनाही आजीला भेटून दिलेलं नाही. आजीच्या विचित्र व्यवसायामुळे तिला तिच्या नातवंडांना भेटता येत नाहीये. असं असूनही रूबीनं तो व्यवसाय सोडलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







