बर्न, 20 जून : रस्त्यावर थुंकू नये, लघवी किंवा शौच करू नये, कचरा टाकू नये आपल्याला माहिती असलेले हे स्वच्छतेसंबंधी काही नियम . ज्याचं उल्लंघन केलं तर दंडही भरावा लागतो. पण सरकारने तुम्हाला शौचालयात जाऊन फ्लश करू नका, असं सांगितलं तर आश्चर्याचा मोठा धक्काच बसेल नाही का? पण हा विचित्र कायदा एका देशात आहे. जिथं एका विशिष्ट वेळेत टॉयलेट मध्ये फ्लश करण्यास बंदी आहे आणि तसं केलं तर त्याला शिक्षेला सामोरं जावं लागतं. देशात शांतता, सुव्यवस्था राहावी यासाठी काही नियम, कायदे असतात. प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे कायदे असतात. असाच टॉयलेटसंबंधी हा विचित्र कायदा आहे तो स्वित्झर्लंडमध्येजिथं रात्री दहा वाजल्यानंतर तुम्हाला टॉयलेटमध्ये फ्लश करता येत नाही.
सामान्यपणे कायदे-नियम हे सार्वजनिक किंवा व्यापक स्वरूपात परिणाम करणाऱ्या गोष्टींसाठी लागू असतात. पण स्वित्झर्लंडमधील हा नियम फक्त सार्वजनिक शौचालयात लागू आहे, असं नाही तर अगदी तुम्हाला घरच्या वैयक्तिक शौचायलाबाबतही हाच नियम लागू होतो. Weird Tradition : इथं लग्नाआधी नवरदेव नवरीसाठी खरेदी करतो इनरविअर आणि लग्नातच… स्वित्झर्लंडमधील या विचित्र कायद्यानुसार याला ध्वनी प्रदूषण मानलं जातं कारण यामुळे इतरांच्या झोपेत व्यत्यय येतो. तरी तुम्ही या नियमाचं उल्लंघन केलं आणि रात्री टॉयलेटमध्ये फ्लश केलं तर हा गुन्हा मानला जातो, ज्यासाठी दंड भरावा लागू शकत. तसंच कठोरात कठोर शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे टॉयलेटमधून पाण्याचा आवाज आला तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता. सिंगापूरमध्येही टॉयलेटसंबंधी असाच एक कायदा आहे. जिथं टॉयलेट वापरल्यानंतर तुम्ही फ्लश केलं नाही तर 150 डॉलर म्हणजे तब्बल 8000 रुपयांचा दंड भऱावा लागतो. जर दंड भरला नाही तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं. Weird Tradition : इथं लोकांना मृत्यूही हवाहवासा वाटतो; 7 वर्षे आधी स्वतःच करतात आपल्या मरणाची तयारी तुमचं या नियमाबाबत काय मत आहे, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.