मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नात मिळालं असं गिफ्ट; पाहताच नवरी झाली लाजेनं गुलाबी, नवरदेव हैराण

लग्नात मिळालं असं गिफ्ट; पाहताच नवरी झाली लाजेनं गुलाबी, नवरदेव हैराण

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झाले, पण तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही.

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झाले, पण तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही.

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झाले, पण तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही.

मुंबई, 09 जून : लग्नामध्ये कोण काय गिफ्ट (Wedding gift) देईल सांगू शकत नाही. याआधी अशा विचित्र गिफ्टचे बरेच व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाले आहेत. महागाईच्या काळात कुणी कांदे-बटाटे दिली, कुणी भाजीपाला दिला. तर मजा म्हणून कुणी बाळाची दुधाची बाटली,  लहान मुलांची खेळणी, पाळणा असंकाहीतरी दिलं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका लग्नातील विचित्र गिफ्टचा (Weird Gift) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झालेच. पण गिफ्ट पाहून तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही. तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल (Funny Video).

official_niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता वर आणि वधू स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मित्र परिवार आहे. नवरीच्या हातात एक गिफ्ट दिलेलं आहे. तिथं स्टेजवरच ते गिफ्ट तिला खोलायला लावतात. एक लांब असा बॉक्स आहे.

हे वाचा - OMG! जुळी, तिळी नाही तर एकाच वेळी 10 बाळांना जन्म; महिलेनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

नवरी जेव्हा त्या बॉक्मसधील गिफ्ट बाहेर काढते, तेव्हा ती हैराणच होते. लाजेनं गुलाबी झालेलीसुद्धा दिसते. गिफ्ट म्हणून तिला एक लाटणं आणि चिमटा मिळालेला असतो. आता हे असं गिफ्ट कशासाठी हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीच. विशेषतः जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला हे असं गिफ्ट मिळण्यामागील कारण तर समजलंच असेल. आता या मित्रांनी नववधूला हे गिफ्ट स्वयंपाक घरात वापरण्यासाठी दिलं आहे की नवऱ्याची धुलाई करण्यासाठी काय समजायचं ते तुम्हीच समजा.

हे वाचा - नवरी-नवऱ्याची पहिलीच भेट जबरदस्त,VIRAL VIDEO पाहा,नवरीचं हे काम पाहून व्हाल हैराण

साहजिकच नववधूच्या हातात हे असं गिफ्ट पाहून नवऱ्याची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही तुम्हाला आली असेल. तसा तोसुद्धा हे विचित्र गिफ्ट पाहून हैराण झालाच आहे. पण तरी आपलं लग्न म्हणून चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहे. गिफ्ट पाहून नवरा-नवरीची अवस्था काहीही झालेली असूदे. पण तुम्हाला मात्र नक्कीच मजा आली असेल. तुम्ही तर पोट धरून हसला असाल. कदाचित तुम्हालाही एखाद्याच्या लग्नात काहीतरी हटके गिफ्ट देण्याची आयडिया या निमित्ताने मिळाली असेल.

First published:

Tags: Funny video, Marriage, Viral, Viral videos, Wedding