केपटाऊन, 09 जून : एखाद्या महिलेनं जुळ्या मुलांना (Twins) जन्म दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अगदी एखाद्या महिलेनं तिळ्यांना म्हणजे एकावेळी तीन मुलांना जन्म दिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला क्षणभर आश्चर्य देखील वाटलं असेल. पण याच अनुषंगाने असलेली ही बातमी वाचल्यावर तुमच्या मनात `ऐकावं ते नवलच` अशी प्रतिक्रिया उमटल्या शिवाय राहणार नाही. एखाद्या महिलेनं एकाच वेळी 10 बालकांना जन्म दिल्याचं (Woman gave birth to 10 babies) तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण असा प्रकार प्रत्यक्षात दक्षिण अफ्रिकेत (South Africa) घडला आहे. हा एक विश्वविक्रम (World Record) मानला जात आहे.
गोसियामी धमारा सिटहोल (Gosiame Thamara Sithole) नावाच्या महिलेनं एका वेळी 10 बालकांना जन्म दिला आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, 37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल एका वेळी 7 मुली आणि 3 मुलांना जन्म दिला आहे. गोसियामी धमारा सिटहोल गर्भवती (Pregnent) असताना त्यांना 6 मुलं होऊ शकतात, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. परंतु, 7 जून रोजी गोसियामी यांच्यावर शस्त्रक्रिया केली असता त्यांनी एका वेळी 10 बालकांना जन्म दिला.
हे वाचा - जगातली सर्वात मोठी विष्णूची मूर्ती एका मुस्लीम देशात पाहा PHOTOS
याबाबत गोसियामीने सांगितलं, "माझ्या पतीला विश्वास होता की आम्हाला 8 मुलं होतील. या सर्व बालकांचे स्वाथ्य चांगले असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आहेत. प्रेग्नसीच्या दरम्यान माझ्या पोटात 8 बालकं असल्याचा डॉक्टरांना वाटलं तेव्हा त्यांनी मला सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली. कारण थोडासा निष्काळजीपणा सर्व बालकांसाठी धोकादायक ठरू शकतो, हे डॉक्टरांना माहिती होते. एक वेळ अशी आली की मी खूपच आजारी पडले. प्रेग्नसी दरम्यान होणाऱ्या तीव्र वेदनांचा देखील मी सामना केला, परंतु माझ्या मनात एक गोष्ट पक्की होती की मला होणारी बालकं ही स्वस्थ असावीत"
माध्यमांमधील वृत्तानुसार, गोसियामी यांची सर्व बालके पूर्णतः स्वस्थ असली तरी त्यांना काही दिवस इन्क्युबेटर्समध्येच (Incubators) ठेवावं लागणार आहे. मेलऑनलाईनच्या वृत्तानुसार, गोसियामी यांची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने झाली होती. मात्र प्रेग्नसीच्या काळात त्यांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला. त्यांच्या पायांमध्ये आणि कंबरेमध्ये सातत्याने वेदना होत असत. मात्र एखादी चूक आपल्या सर्व बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव त्यांना होती. त्यानंतर सर्व काही ठिक झाले आणि गोसियामी या जगातील सर्वाधिक बालकांना एकावेळी जन्म देणाऱ्या महिला ठरल्या.
हे वाचा - इटुकल्या पिटुकल्या उंदराने केलं लय भारी काम; हजारो लोकांचा जीव वाचवला
यापूर्वी हे रेकॉर्ड मोरोक्कोमधील (Morocco) माली येथील हलीमा सीसी या महिलेच्या नावावर होते. हलीमा यांना 9 मुलं आहे. त्यात 5 मुली आणि 4 मुलांचा समावेश आहे. मात्र गोसियामा यांनी हलीमा यांचे रेकॉर्ड केवळ एका महिन्यातच तोडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Pregnant woman, Woman, World record