नवी दिल्ली 26 सप्टेंबर : लग्नातील मजेदार व्हिडिओ (Funny Wedding Video) सतत सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होताना दिसतात. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधत असतात नवरी आणि नवरदेव. मात्र, अनेकदा नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) सर्वांसमोरच असं काही करतात की मंडपात हशा पिकतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरीनं असं काही केलं की हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधू लागला.
बापरे...इतके लांब कान! या कुत्र्याच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
पाणीपुरीचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरीचे चाहते कधीही आणि कुठेही ती खाण्यासाठी तयार असतात. मात्र, तुम्ही कधी नवरीबाईला मंडपात पाणीपुरी खाताना पाहिलंय का? जर पाहिलं नसेल तर आता पाहा. सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात नवरीबाई आपलं लग्न बाजूला ठेवून पाणीपुरी खाताना दिसते. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका नवरीला पाणीपुरी खाण्याची इतकी इच्छा झाली की स्टेजवरुन पळत येत ती पाणीपुरी खाऊ लागली आणि नंतर परत स्टेजवर गेली. यादरम्यान नवरीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की जणू ती पाणीपुरीचीच वाट पाहात होती आणि पाणीपुरी समोर दिसताच नवरीनं त्यावर ताव मारला.
प्रसूतीदरम्यान घडलं असं काही की जोरजोरात ओरडू लागली महिला; पाहून सगळेच हैराण
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wedabout नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. आपल्या लग्नात पाणीपुरीची खाण्याची मजा घेणारी ही नवरी नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video