जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Weird Disease : मासिक पाळीत तरुणीच्या डोळ्यातूनही यायचं रक्त; धक्कादायक कारण

Weird Disease : मासिक पाळीत तरुणीच्या डोळ्यातूनही यायचं रक्त; धक्कादायक कारण

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

एका तरुणीला मासिक पाळी येताच तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू यायचे. तिला विचित्र असा आजार असल्याचं निदान झालं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

चंदीगड, 24 मार्च : मासिक पाळी म्हणजे पीरियड्सच्या वेळी पोटात दुखणं, अंग दुखणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं यासारखी लक्षणं अनेक महिलांना जाणवतात. मात्र पीरियड्सच्या वेळी डोळ्यातून रक्ताचे अश्रू येत असल्याचं ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण आतापर्यंत असं कधीच ऐकण्यात आलं नाही. पण चंदीगडमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीच्या बाबतीत हे घडलं आहे. मासिक पाळीच्या काळात तिच्या डोळ्यातून रक्तासारखे अश्रू वाहतात_._ चंदीगडमध्ये राहणारी 25 वर्षीय तरुणी डोळ्यातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे उपचारासाठी शहरातील एका रुग्णालयात गेली होती. तिने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल डॉक्टरांना माहिती सांगितली असता त्यांनासुद्धा धक्का बसला. तिनं डॉक्टरांना सांगितलं की, ‘एका महिन्यापूर्वीच तिला अशाच प्रकारचा त्रास झाला होता. तिच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला होता. हा त्रास होत असतानादेखील तिला अस्वस्थता येत नव्हती.’ माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तिचा त्रास पाहून डॉक्टरांनी तिला वेगवेगळ्या नेत्रचिकित्सा आणि रेडिओलॉजिकल टेस्ट करायला सांगितल्या. पण या टेस्टचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टरांना या तरुणीच्या शरीराच्या इतर कोणत्याही अवयवांमधून रक्तस्राव होत असल्याचे आढळले नाही. या तरुणीला डोळ्यातून रक्तस्राव होण्याबाबत किंवा जुन्या समस्यांचा कोणताही इतिहास नसल्यामुळे डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. पायावर अचानक आली एक खूण, 9 दिवसांतच तरुणीचा मृत्यू; तुमच्या पायावर तर नाही ना? डॉक्टरांनी या प्रकरणाचा पुढील तपास केला असता त्यांच्या असं लक्षात आलं की दोन्ही वेळा या तरुणीच्या डोळ्यातून रक्तस्राव झाला त्यावेळी तिला पीरियड्स आले होते. या तरुणीला मासिक पाळीसंबंधी ‘ocular vicarious menstruation’ हा आजार झाल्याचे समोर आले. या दुर्मिळ अवस्थेमध्ये बाह्य अवयवांमधून मासिक पाळीच्या काळात चक्रीय रक्तस्राव होतो. रक्तस्राव होण्याचं शाधारण स्थान नाक असतं मात्र ते ओठ, डोळे, फुफ्फुस आणि पोटातूनदेखील उद्भवू शकतं. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. संशोधकांनी असं सांगितलं की, मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम रक्तस्त्राव होण्याच्या परिणामी या अवयवांमधील रक्तवहिन्यासंबंधात होतो. दरम्यान, रक्तस्राव होण्याच्या अचूक शारीरिक कारणांबद्दल डॉक्टर अद्याप सांगू शकलेले नाहीत. असं पहिल्यांदाच घडलं! माणसाला झाला ‘झाडांचा आजार’, जगातील पहिलं प्रकरण भारतात विशेषतज्ज्ञांचे असं म्हणणं आहे की, एंडोमेट्रिओसिस किंवा एक्स्ट्रोजेनिटल अवयवांमध्ये एंडोमेट्रियल टिशूची उपस्थिती विकृतिविना मासिक पाळीच्या स्थितीला विकसित करण्याचे कारण होऊ शकते. या तरुणीला तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या. त्या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचं मिश्रण होतं. तीन महिन्यांनंतर त्या महिलेच्या डोळ्यांतून रक्तस्राव होणं बंद झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात