जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पायावर अचानक आली एक खूण, 9 दिवसांतच तरुणीचा मृत्यू; तुमच्या पायावर तर नाही ना?

पायावर अचानक आली एक खूण, 9 दिवसांतच तरुणीचा मृत्यू; तुमच्या पायावर तर नाही ना?

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

तरुणीच्या पायावरील खुणेचं नेमकं कारण डॉक्टरांनाही समजलं नाही. त्यांनी सामान्य दुखापत मानून तिला वेदनाशामक औषध दिलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बर्न, 29 मे :  आपल्या हातापायावर कधी कुठे लागलं, भाजलं की थोडीशी खूण येते. पण काही वेळा काहीच न होताही आपल्या त्वचेवर खुणा दिसतात. बऱ्याचदा या खुणांकडे आपण दुर्लक्ष करतो. अशाच एका तरुणीच्या पायावर अशी खूण आली आणि 9 दिवसांतच तिचा मृत्यू  झाला. स्कॉटलंडमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. केटी असं या मुलीचं नाव. तिची आई जेनने सा्ंगितल्यानुसार तिच्या पायावर एक दिवस अचानक निळ्या रंगाची खूप दिसली. केटीला वाटलं एखादा कीडा चावला असेल. पण हळूहळू यातून वेदना वाढत गेल्या. तेव्हा मात्र तिला चिंता वाटू लागली. तेव्हा तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. रुग्णालयात दोन डॉक्टरांनी तिला तपासलं. पण खुणेचं नेमकं कारण डॉक्टरांनाही समजलं नाही. त्यांनी सामान्य दुखापत मानून तिला वेदनाशामक औषध दिलं. पण त्यानंतर 9 दिवसांतच केटीचा मृत्यू झाला. मिठी मारली, मोठी घटना टळली; ‘जादू की झप्पी’ची कमाल पाहून पोलीसही चक्रावले आपल्या मुलीचा मृत्यू ज्यामुळे झाला, त्या कारणामुळे इतर कुणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी तिचे पालक आता या आजाराबाबत जनजागृती करत आहेत. केटीला डीव्हीटी म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिस आजार झाला होता. यात नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होतात. सहसा हे पायांमध्ये होतं. यामुळे त्या ठिकाणचा भाग सूजतो, तिथं वेदना होतात आणि तो भाग गरमही होतो. काही काळानंतर वेदनांच्या ठिकाणी त्वचा लाल आणि नंतर काळी होऊ लागते. नसा कडक होतात. त्यांना स्पर्श केला तर असह्य वेदना होतात. एका क्षणी ते विषासारखे बनते. जोशाजोशात भयंकर घडलं! सलग 24 तास रोमान्सचा भयानक The End केटीचा मृत्यू होईपर्यंत या आजाराची त्यांना माहितीच नव्हती. याचं त्यांना दुःख आहे. त्यामुळे ते आता लोकांना याबाबत सावध करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात