जयपूर 09 डिसेंबर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, अनेकदा लग्नाच्या वेळीच अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता राजस्थानमधून समोर आली आहे. यात डूंगरपुरच्या सीमलवाडा येथील कंबोईयामध्ये वरात येण्याआधीच नवरी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. नवरीच्या बहिणीचंही त्याच दिवशी लग्न होतं. या दोन्ही बहिणींचं लग्न दोन सख्ख्या भावांसोबत होत होतं. मात्र, वरात येण्याआधीच लहान बहीण प्रियकरासोबत फरार झाली.
यादरम्यानच वरातही नवरीच्या गावात आली. नवरी फरार झाल्याची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी नवरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. उदयपूरमध्ये लोकेशन सापडल्यावर पोलिसांनी नवरीला तिथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन सख्ख्या बहिणींचं लग्न ४ डिसेंबर रोजी होणार होतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. धाताणा गावातून दोन सख्ख्या भावांची वरात येणार होती, मात्र सकाळी पाच वाजण्याच्या सुमारासच नवरीच्या कुटुंबीयांना समजलं, की एक नवरी घरी नाही आणि ती पळून गेली आहे.
यानंतर कुटुंबातील लोकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान सकाळी दहा वाजता नवरदेव वरात घेऊन आले. या गोष्टीची माहिती मुलाकडच्यांना मिळताच एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवरदेव एकसोबत लग्न करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. नवरी पळून गेल्याने तिच्याच लहान बहिणीसोबत लग्न करण्याची मागणी नवरदेव करू लागला. मात्र, छोट्या बहिणीने नकार दिला. नंतर समजलं की नवरी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. पोलिसांनी उदयपूरमधून दोघांनाही ताब्यात घेतलं.
दुसरीकडे लहान नवरी पळून गेल्याने तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न थांबलं. वरात घेऊन आलेले दोन्ही भाऊ नवरीला न घेताच परत गेले. पोलीस फरार नवरीला परत घेऊन आले तेव्हा तिने आरोपी युवक समीर याने आपलं अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणीला आपल्या पालकांच्या हवाली केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.