मुंबई, 5 मे : सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. त्यामुळे लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी हे व्हिडीओ मनोरंजक असतात. तर कधी एखाद्या भावनीक क्षणांचे, तर कधी असे व्हिडीओ असतात, जे पाहून नेटकऱ्यांना ही आश्चर्य वाटेल. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वधू आणि वराशी संबंधीत आहे. जेव्हा दोघेही लग्नासाठी स्टेजवर उभे असतात. तेव्हा त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडतो की ज्यामुळे नवरदेवावर लाजेची वेळ येते. पण पुढे तो असं काही करतो, जे पाहून उपस्थीत सगळ्यांना धक्का बसतो. भरमंडपात नवरदेवाचं विचित्र कृत्य, नववधूला जवळ घेतलं आणि…. पाहा Viral Video लग्न म्हटलं की लहान-मोठे अडथळे येतातच. या अशा प्रसंगांना कसे हाताळायचे हे माहीत असेल तर मात्र कोणताही अडथळा टिकू शकणार नाही आणि तसंच काहीसं नवरदेवानं केलं. जेव्हा वराला वधूच्या गळ्यात हार घालायचा होता तेव्हा तो हार एका बाजूने तुटला. यामुळे वधूला काळजी वाटली, परंतु यानंतर वराने जे केलं ते पाहण्यासारखे आहे. खरंतर नवरदेवानं या हाराच्या धाग्याच्या मदतीने गाठ मारण्याचा प्रयत्न केला, जेणे करुन तो हार ठिक होईल आणि तो नववधूच्या गळ्यात घालू शकेल. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral त्याची अशी हुशारी आणि कौशल्य पाहून उपस्थीत लोकांना आश्चर्य वाटलं. शिवाय जवळील एका व्यक्तीने नवऱ्याच्या अशा कामामुळे त्याच्यावर पैसे उडवण्यासाठी सुरुवात केली. नवरदेवाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत.
या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओचे नेटिझन्सनी कौतुक केले आहे. वराच्या हावभावाने एका विचित्र परिस्थितीला वधूसाठी सर्वात सुंदर क्षणांपैकी एक बनवले आणि त्यांचा वरमाला सोहळा अविस्मरणीय बनला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर weddingsunfolded नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.