नवी दिल्ली, 19 मे : उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग, अशी म्हण आहे. पण सध्या एका उतावळ्या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या नवरीला लग्ना ची इतकी घाई की ती अर्धवट कपड्यांतच लग्नमंडपात पोहोचली. तिथं गेल्यावर तिने अर्धवट कपडे घातल्याचं लक्षात आलं आणि पुढे असं काही घडलं की पाहूनच थक्क व्हाल. लग्नाचा हा अनोखा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ख्रिश्चन परंपरेनुसार विधी केले जात आहेत. वधू आणि वर सर्व उपस्थित आहेत. पण नवरीचं तिथं लक्ष नाही. म्हणजे ती इकडे तिकडे पाहते आहे. काहीतरी विसरली आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ती काय विसरली हे तिच्या लक्षात येतं आणि ती माइक आपल्या हातात घेत आपल्याला काहीतरी सांगायचं असल्याचं म्हणते. VIDEO - लग्नात नवरदेवाने केला नको तो हट्ट; सासऱ्याने जावयाला भरमंडपातच चपलेने चोपलं नवरीबाई चक्क लग्न थांबवायला सांगते. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं. नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडतो. नवरी पुढे त्यामागील कारण सांगते. ती सांगते तिला तिच्या लग्नासाठी जसे कपडे घालायचे होते, तसे तिने घातले नाहीत. लग्नाचा ड्रेस अर्धवट घालूनच ती स्टेजवर आली होती. आपल्याला आता पूर्ण कपडे घालायचे आहेत, घालू शकते का? अशी परमिशनही ती सर्व पाहुण्यांकडे मागते. पाहुणेही हसत हसत तिला परवानगी देतात आणि नवरीबाई तिथंच ड्रेस बदलते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तिचा अर्धवट राहिलेला ड्रेस काही तरुणी तिला स्टेजवर घालतात. त्यानंतर थोड्या वेळापुरतं थांबलेलं लग्न पुढे सुरू होतं. स्टेजवरच ऐनवेळी नवरीचा लग्नास नकार; कारण ऐकून पाहुणेही चक्रावले बेकी असं या नवरीचं नाव आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटर आपल्या लग्नाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. लग्न मध्येच थांबवण्याचं तिचं कारण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. काहींनी त्याला मूर्खपणा म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
तुम्हाला नवरीबाईचं हे वागणं कसं वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्सममध्ये नक्की सांगा.