वॉशिंग्टन, 01 फेब्रुवारी : लग्न फक्त कपलसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही एक खास, अविस्मरणीय क्षण असा असतो आणि हा क्षण जपून ठेवायला प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे फोटोग्राफर्स हा लग्नाचा एक अविभाज्य भाग म्हणायला हरकत नाही. पण जर ऐनवेळी तुमच्या लग्नात फोटोग्राफर आलाच नाही तर... फक्त विचार करूनच तुम्हाला राग आला. असंच घडलं ते एका लग्नात. लग्नात फोटोग्राफर न आल्याने नवरीमुलीचे वडील संतप्त झाले आणि त्यांनी रागात मोठं पाऊल उचललं.
आपल्या लेकीच्या लग्नाबाबत प्रत्येक वडील स्वप्न पाहतात. मुलीचं लग्न अगदी थाटात लावायचं असतं. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये राहणारे भारतीय-अमेरिकी डॉक्टर अमित यांनीही आपल्या मुलीच्या लग्नात कसलीच कसर सोडली नाही. एका प्रसिद्ध कंपनीचा फोटोग्राफर ज्याचं नाव क्लेन गेसेल आहे, त्याला त्यांनी हायर केलं होतं. लग्नाचं ठिकाण, फोटो या सर्वांबाबत त्यांचं बोलणं झालं. फोटो काढण्यासाठी लाखो रुपयेही दिले होतं. सर्वकाही ठरलं पण शेवटच्या क्षणी फोटोग्राफरने अटी ठेवल्या आणि तो लग्नात आलाच नाही.
हे वाचा - आता हद्दच झाली राव! भरमंडपातच त्याने नवरीला..., नवरदेवाच्या मित्राच्या विचित्र कृत्याचा VIDEO VIRAL
डेली मेलच्या रिपोर्टनुसार लग्नाच्या ठिक 5 दिवस आधी फोटोग्राफर गेसने जिथं लग्न होत होतं, त्याचा लक्झरी हॉटेलमध्ये आपल्या आणि आपल्या सहकारी कॅमेरापर्सनच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. आधी तो दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तयार होता. त्यामुळे डॉक्टर अमित यांनी याला नकार दिला.
त्यानंतर फोटोग्राफर टर्कीत होत असलेल्या लग्नात आलेच नाहीत. अमित यांनी घाईघाईत कसाबसा दुसरा फोटोग्राफर अरेंज केला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्यांनी कंपनीकडून 22 लाख रुपये अँडवान्स परत मागितला. कंपनीने यावर काहीच रिप्लाय दिला नाही. त्यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी कोर्टात धाव घेतली. फोटोग्राफरवर 62 लाख रुपयांचा दावा ठोकला.
हे वाचा - VIDEO - अरे हिला आवरा! नवरीबाई जोशात असं काही करू लागली नवरदेवही लाजला; सर्वांना हाका मारू लागला
मुलीच्या लग्नासाठी त्यांनी 13 कस्टम आउटफिट्स बनवले होतो. एका फॅशन मॅगझिनच्या फिचरचाही बंदोबस्त केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral, Wedding, World news